no images were found
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील 914 प्रकरणांमध्ये निवाडा
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील 2 हजार 854 न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे आणि 12 हजार 164 वादपूर्व प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये 914 प्रकरणांमध्ये निवाडा होऊन वाद संपुष्टात आले. 5 कोटी 86 लाख 76 हजार 446 एवढ्या रक्कमेची वसूली आणि वाद सांमजस्याने मिटविण्यात आले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे व्ही आर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत झाली. लोकअदालतचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व्ही. आर. जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा न्यायाधीश -1 एल. डी. बिले, वकील संघाचे सदस्य, वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अमित कुलकर्णी व इतर सर्व न्यायिक अधिकारी आणि विधीज्ञ उपस्थित होते.