Home राजकीय संसदेत महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याची वेळ येते तेव्हा राहुल परदेशात असतात.

संसदेत महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याची वेळ येते तेव्हा राहुल परदेशात असतात.

32 second read
0
0
12

no images were found

संसदेत महत्त्वाच्या विषयांवर बोलण्याची वेळ येते तेव्हा राहुल परदेशात असतात.

      लोकसभेत अध्यक्षांविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याचा दिवस आला तेव्हा वातावरण आधीपासूनच तापलेले होते. पण जसेच राजकारणातील चाणक्य आणि प्रत्येक विषयावर पूर्ण तयारीनिशी उभे राहणारे रणनीतिकार अमित शहा बोलण्यासाठी उभे राहिले, तसे क्षणभर संपूर्ण सभागृह शांत झाल्यासारखे वाटले. कारण संसदीय राजकारणाचे बारकाईने निरीक्षण करणाऱ्यांना हे ठाऊक असते की, जेव्हा शाह बोलण्यासाठी उभे राहतात तेव्हा ती चर्चा केवळ एक साधी चर्चा न राहता; अनेकदा युक्तिवाद, वस्तुस्थिती आणि राजकीय संदेशांचा असा एक मिलाफ बनते, जो विरोधकांची रणनीती पूर्णपणे उधळून लावण्यास समर्थ असतो.त्या दिवशीही सभागृहात काहीसे असेच दृश्य पाहायला मिळाले.

         त्या दिवशी सभागृहात चर्चेचा विषय लोकसभा अध्यक्षांविरुद्ध आणलेला अविश्वास प्रस्ताव होता, जो जवळपास चार दशकांनंतर समोर आला होता. भारताचे सर्वात मोठे लोकशाही व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सभागृहात अशा प्रकारची घटना घडणे साहजिकच असाधारण मानले जाते. ही चर्चा जवळजवळ १३ तास चालली, ज्यामध्ये ४० पेक्षा जास्त खासदारांनी आपली मते मांडली आणि शेवटी हा प्रस्ताव ध्वनी मताने फेटाळण्यात आला. पण चर्चा जसजशी पुढे सरकत गेली, तसतसे अनेक खासदार आणि राजकीय निरीक्षकांच्या मनात एकच प्रश्न फिरत राहिला – हा खरोखर अध्यक्षांविरुद्ध अविश्वासाचा मुद्दा होता की मुख्य विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एक प्रभावी संसद सदस्य म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात आलेले अपयश झाकण्याचा हा एक प्रयत्न होता?

          संसदेत प्रभावी खासदार होण्यासाठी केवळ राजकीय कौशल्येच नव्हे तर नियमांची समज, चर्चेत सातत्यपूर्ण सहभाग आणि सभागृहात वेळेवर उपस्थिती असणे आवश्यक आहे, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून अमित शहा यांचे अनेकदा उल्लेख केले जाते.

        जेव्हा सभागृहात महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याची वेळ येते, तेव्हा बहुतेकदा मुख्य विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी देशाबाहेर असतात. कधी जर्मनीला, कधी व्हिएतनामला, कधी युनायटेड किंग्डमला, कधी सिंगापूर आणि मलेशियाला – अशा अनेक दौऱ्यांचा उल्लेख राजकीय चर्चांमध्ये अनेकदा केला जातो. आणि मग हेच नेते तक्रार करताना दिसतात की त्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. त्यामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या लोकांच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो- जर खासदार त्यावेळी उपस्थित नसतील तर ते सभागृहात कसे बोलतील?

        म्हणूनच, त्या दिवशीच्या चर्चेदरम्यान सभागृहातील काही सदस्यांनी अशी भूमिका मांडली की, अध्यक्षांवर करण्यात आलेला हल्ला हा कदाचित एक प्रभावी खासदार म्हणून कार्य करण्यास असमर्थ ठरल्यामुळे निर्माण झालेली राजकीय अस्वस्थता लपवण्याचाच एक प्रयत्न असू शकतो.

       चर्चेदरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. संसदच्या कामकाजाचे नियम. संसदच्या परंपरा आणि नियमांची माहिती असलेल्यांना माहीत आहे की लोकसभा ही कोणत्याही राजकीय मेळाव्यासारखे चालत नाही. येथे प्रत्येक सदस्याला ठरलेल्या प्रक्रियेप्रमाणे आणि नियमांनुसारच बोलावेलागते.लोकसभेचे नियम ३७४, ३७५ आणि ३८० यांसारख्या तरतुदी स्पष्ट सांगतात की, सभागृहात गोंधळ झाला,

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांच्याकडून त्या चालक वाहकांचा सत्कार..:कौतुकाची थाप पाठिवर पडल्याने चालक आणि वाहक भारावले..

परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांच्याकडून त्या चालक वाहकांचा सत्कार..:कौतुकाची थाप पाठिव…