no images were found
पुणे,राज्याच लाडकं नेतृत्व अजित पवार यांचा विमान अपघातात दुदैवी मृत्यू झाल्याच्या घटनेला महिना लोटला असला तरी त्यांच्या अपघाताबद्दल अनेक शंका, संभ्रम अद्याप ही कायम आहे. विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’ मध्ये अपघातापूर्वी वैमानिकांचे अंतिम संभाषण काय होते? हे अजूनही समोर आलेले नाही. अनेक प्रश्न अद्यापही दादांच्या अपघातासंदर्भात उपस्थित केले जातात, अशात भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी यासंदर्भात बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करीत सखोल चौकशीची आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.
खासगी विमान कंपनी व्हीएसआर च्या या विमानाला झालेल्या अपघातात अजित दादांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की त्यात मानवी चुक होती? लॅन्डिंग दरम्यान निष्काळजीपणा करण्यात आला होता का ? याचा तपास करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयासोबत (डीजीसीए) मिळून पोलिसांनी तपास करावा, असे आवाहन देखील पाटील यांनी केले. डीजीसीएने देखील अपघात संदर्भात त्यांनी गेल्या महिन्याभरात केलेल्या तपासाची प्रगती अहवाल जनतेसमोर मांडावा,असे पाटील म्हणाले.
विमानाची देखभाल करणाऱ्या व्हीएसआर व्हेंचर या कंपनीच्या भूमिकेची देखील चौकशी केली जावे, अशी मागणी देखील त्यांनी बारामती पोलीस स्टेशन कडे केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची तसेच तपासासाठी पुणे पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्याची मागणी देखील पाटील यांनी केली आहे. अपघातामागील नेमके कारण सर्वसामान्यांसमोर आले पाहिजे, यासाठी हा लढा असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.