no images were found
कोटीतीर्थ मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले सहा दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सील
कोल्हापूर(प्रतिनिधी) : महानगरपालिका मालकीचे भाडे तत्वावर देण्यात आलेले कोटीतीर्थ मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले 6 दुकानगाळे आज इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागामार्फत वसुली मोहिम राबवण्यात येत आहे.
यामध्ये मागील थकबाकी व सन 2025-26 चे महापालिकेचे दुकान भाडे भरणे बाबत वेळोवेळी इस्टेट विभागामार्फत भाडेकरुंना सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज सदरची कारवाई कोटीतीर्थ मार्केट व छ.शिवाजी मार्केट येथे राबविण्यात आली. यावेळी थकीत असलेले 5 दुकानगाळे सील करण्यात आले. यामध्ये कोटीतीर्थ मार्केटमधील शेतकरी सह संघ (थकबाकी रक्कम रू.6,74,999/-), खुशालदास शाळीग्राम मालानी (थकबाकी रक्कम रू.6,74,100/-), हरिषचंद्र दत्ताराम दुखंडे (थकबाकी रक्कम रू.2,42,686/-), शशिप्रिया विजयसिंह देशमुख (थकबाकी रक्कम रू.1,05,372/-), राघवजी रावजी कट्यार (थकबाकी रक्कम रू.2,14,598/-) व छ.शिवाजी मार्केटमधील वासुदेव आत्माराम देसाई (थकबाकी रक्कम रू. 4,84,000/-) अशा 6 दुकानगाळयांचा समावेशअ आहे.
यापुढे ही थकबाकीदारांवर दुकान गाळे सील होणेची तसेच मिळकतीवर बोजा नोंद करणेची कार्यवाही ठेवली जाणार असून महापालिका मालकीचे दुकान गाळेतील भाडेकरुंनी आपली थकबाकी मुदतीत भरण्यात यावी असे इस्टेट विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
आजची कारवाई अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप-आयुक्त किरण धनवाडे, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, इस्टेट ऑफिसर विलास साळोंखे, लिपीक अरुण भोसले, जर्नादन भालकर, गिरीष नलवडे जमादार, कल्पना शिरदवाडे, सदानंद फाळके, संजय साळोखे यांनी केली.