
no images were found
बॉस गर्ल वाइब्स: सिमरन कौर ‘!
झी टीव्हीवरील मालिका ‘जमाई नं. 1’ आपल्या प्रीमियरपासून सर्व योग्य कारणांमुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या अभिषेक मलिक आणि सिमरन कौर यांना नील आणि रिद्धी या नावानेही ओळखले जाऊ लागले आहे. अलीकडील भागामध्ये, रिद्धी नानीला दिलेले वचन कसे पाळते आणि नीलला तिच्या ऑफिसमध्ये नोकरीची ऑफर देते हे दर्शकांनी पाहिले. मात्र यामागे एक छुपा अजेंडा आहे, रिद्धी एक बॉस गर्ल असल्याने, तिथे काम करू लागल्यानंतर नीलचे आयुष्य दयनीय बनवण्याची गुप्त योजना ती आखते.
टेलिव्हिजनच्या जगात शूटिंगचे दीर्घ तास आणि व्यस्त शेड्यूलमुळे वैयक्तिक वेळ फारच कमी मिळतो त्यामुळे तंदुरुस्त आणि निरोगी राहणे हे एक आव्हानच बनते. तरीही, अभिनेत्री सिमरन कौर तिचा फिटनेस राखणे आणि तिच्या व्यक्तिरेखेला न्याय देणे या गोष्टींबाबत तडजोड करू शकत नाही आणि आपल्या ऑन-स्क्रीन व्यक्तिरेखेप्रमाणेच आत्मविश्वास दर्शवण्यासाठी आणि बळकट दिसण्यासाठी व शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तिच्या सर्वोत्तम आकारात राहण्यासाठी पिलाटेज आणि चांगला डाएट स्वीकारला.
सिमरन म्हणाली, “माझा विश्वास आहे की फिट राहणे म्हणजे फक्त चांगले दिसणे नाही; तुम्हाला स्वतःचा बळकटपणा जाणवायला हवा आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटायला हवा. पिलाटेज हे माझ्यासाठी गेम चेंजर ठरले आहे. त्यामुळे मी केवळ माझ्या सर्वोत्तम शेफमध्येच राहत नाही तर त्यामुळे माझे लक्ष केंद्रित राहते आणि मी आनंदीही राहते. माझी व्यक्तिरेखा रिद्धी ही एक प्रबळ इच्छाशक्ती असलेली मुलगी आहे जिला तिला काय हवे आहे हे माहित आहे आणि ते पडद्यावर मांडण्यासाठी मी माझी शरीरयष्टी, देहबोली, माझे पोश्चर यांवर काम करत आहे आणि त्यासाठी पिलाटेजपेक्षा अधिक चांगले काय असू शकते. एक अभिनेत्री म्हणून आपल्या व्यक्तिरेखेप्रमाणे दिसणे आणि त्याच प्रकारे वाटणे हे महत्त्वाचे आहे हे मी जाणते. माझ्या ऑन स्क्रीन उपस्थितीमध्ये भर टाकण्यासाठी माझ्या फिटनेस महत्त्वाचा असून त्यामुळे मी एका शक्तिशाली बॉस गर्लची व्यक्तिरेखा अधिक चांगल्या प्रकारे दर्शवू शकते.”
प्रेक्षकांसमोर सर्वोत्कृष्ट गोष्टी आणण्यासाठी कलाकारांनी पडद्यामागील केलेल्या प्रयत्नांचा पुरावा म्हणजे सिमरनची ही फिटनेसची आवड आहे. आगामी एपिसोडमध्ये, रिद्धी आणि तिची आई कांचन (पापिया सेनगुप्ता) यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश करताना नीलसमोर निर्माण केलेल्या सर्व आव्हानांचा सामना नील कसा करतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.