Home मनोरंजन ठरलं तर मग मालिकेत नवा ट्विस्ट सायली आणि अर्जुनच्या भूमिकांची होणार अदलाबदली!

ठरलं तर मग मालिकेत नवा ट्विस्ट सायली आणि अर्जुनच्या भूमिकांची होणार अदलाबदली!

3 second read
0
0
26

no images were found

ठरलं तर मग मालिकेत नवा ट्विस्ट सायली आणि अर्जुनच्या भूमिकांची होणार अदलाबदली!

स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेत लवकरच प्रेक्षकांना एक नवं वळण अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी जोडी अर्थातच अर्जुन-सायलीच्या भूमिकांची लवकरच अदलाबदली होणार आहे. ऑफिसच्या कामाप्रमाणेच घरात दिवसभर राबणाऱ्या गृहिणीच्या कष्टांची दखल देखिल घ्यायला हवी हेच एकमेकांना पटवून देण्याच्या हेतूने अर्जुन सायलीने एकमेकांची कामं करण्याचा निश्चय केलाय. सायलीच्या कामाची जबाबदारी घेतलेला अर्जुन यापुढे स्वयंपाक घर आणि घरची संपूर्ण जबाबदारी खांदयावर घेणार आहे. तर सायली अर्जुनच्या भूमिकेत शिरून ऑफिस आणि कोर्टाच्या कामांची जबाबदारी पेलणार आहे. दोघांसाठीही हा अनुभव नवा असला तरी अनोखी शिकवण देणारा ठरणार आहे. नात्यातील समज, आदर आणि समानतेचं महत्त्व अधोरेखित करणारं मालिकेतलं हे वळण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

लवकरच येऊ घातलेला व्हॅलेण्टाईन डे अर्जुन-सायलीसाठी स्पेशल ठरणार आहे. पहिलं कॉण्ट्रॅक्ट मॅरेज आणि एकमेकांच्या संमतीने झालेलं पहिलं लग्न १४ फेब्रुवारीलाच झालं होतं. त्यामुळे यंदाचा व्हॅलेण्टाईन डे बदलेल्या भूमिकांसोबत ते साजरा करणार आहेत. तेव्हा अर्जुन-सायलीचा हा नवा अंदाज पहायचा असेल तर ठरलं तर मगचे धमाकेदार एपिसोड्स न चुकता पहा दररोज रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…