no images were found
छ.ताराराणी मार्केट मधील थकबाकी असलेले तीन दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सील
कोल्हापूर (प्रतिनिधी): महानगरपालिका मालकीचे भाडे तत्वावर देण्यात आलेले छ.ताराराणी मार्केट मधील थकबाकी असलेले 3 दुकानगाळे आज इस्टेट विभागामार्फत सील करण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागामार्फत वसुली मोहिम राबवण्यात येत आहे. यामध्ये मागील थकबाकी व सन 2025-26 चे महापालिकेचे दुकान भाडे भरणे बाबत वेळोवेळी इस्टेट विभागामार्फत भाडेकरुंना सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज सदरची कारवाई छ.ताराराणी मार्केट येथे राबविण्यात आली. यावेळी थकीत असलेले 3 दुकानगाळे सील करण्यात आले.
यापुढे ही थकबाकीदारांवर दुकान गाळे सील होणेची तसेच मिळकतीवर बोजा नोंद करणेची कार्यवाही ठेवली जाणार असून महापालिका मालकीचे दुकान गाळेतील भाडेकरुंनी आपली थकबाकी मुदतीत भरण्यात यावी असे इस्टेट विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. आजची कारवाई अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप-आयुक्त किरण धनवाडे, सहा.आयुक्त श्रीमती स्वाती दुधाणे, लिपीक अरुण भोसले, रविंद्र काळे, गिरीष नलवडे-जामदार, अविष्कार भोजे, रविंद्र कांबळे, सदानंद फाळके यांनी केली.