Home स्पोर्ट्स भाऊसाहेब गणेश देशपांडे(कोडणीकर) स्मृती तृतीय अतिभव्य खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धा रविवार कोल्हापुरात 

भाऊसाहेब गणेश देशपांडे(कोडणीकर) स्मृती तृतीय अतिभव्य खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धा रविवार कोल्हापुरात 

2 second read
0
0
29

no images were found

भाऊसाहेब गणेश देशपांडे(कोडणीकर) स्मृती तृतीय अतिभव्य खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धा रविवार कोल्हापुरात 

कोल्हापूर(प्रतिनिधी) :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने विझार्ड चेस क्लब,कोल्हापूर ने आयोजित केलेल्या भाऊसाहेब गणेश देशपांडे (कोडणीकर) स्मृति तृतीय अतिभव्य खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन जलद बुद्धिबळ स्पर्धा रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात होणार आहेत.
स्विस् लिग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धा जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होतील.
युवा उद्योजक अमोल देशपांडे, धीरज वैद्य व सुरज वैद्य यांनी आपले आजोबा भाऊसाहेब गणेश देशपांडे (कोडणीकर) यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धा प्रायोजित केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वात मोठ्या जास्त रोख रकमेच्या(रोख रुपये दिड लाख व 119 चषक) आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी आयुर्विमा महामंडळाचा ग्रँडमास्टर श्रीराम झा (दिल्ली), आंतरराष्ट्रीय मास्टर, आयुष शर्मा (मध्य प्रदेश) निखिल दीक्षित (पुणे) व सम्मेद शेटे (कोल्हापूर), फिडे मास्टर सोहम दातार (सातारा) यांच्यासह जवळजवळ 100 आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू मिळून एकूण 200 बुद्धिबळपटू नी आतापर्यंत आपला सहभाग निश्चित केला आहे. *शनिवारी दि.14 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार ते सात वाजेपर्यंत ग्रँडमास्टर श्रीराम झा व आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे त्यांचे विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण साधारणपणे प्रथम येणाऱ्या 40 उदयण्मुख बुद्धिबळपटू साठी विझार्ड चेस अकॅडमी येथे आयोजित केले आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा.* पहिल्या सहा पटावर डीजीटी इलेक्ट्रॉनिक बुद्धिबळ पट लावण्यात येणार असल्यामुळे त्याचे ऑनलाईन प्रक्षेपण केले जाणार आहे… सर्व सहभागी खेळाडू व पालक यांच्यासाठी दुपारची भोजन व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे बुद्धिबळपटूंना जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवायची व वाढवायची नामी संधी मिळणार आहे. या खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, लकी बझार च्या वर, राजारामपुरी कोल्हापूर येथे रंगणार आहेत.
मुख्य एकूण तीस बक्षिसामध्ये स्पर्धा विजेत्यास रोख एकवीस हजार रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.उपविजेत्यास रोख पंधरा हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख दहा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.चौथा क्रमांक रोख आठ हजार रुपये, पाचवा क्रमांक रोख सहा हजार रुपये , सहावा क्रमांक रोख चार हजार रुपये , सातवा क्रमांक रोख दोन हजार रुपये , आठवा क्रमांक रोख पंधराशे रुपये , नऊ ते पंधरा क्रमांकास प्रत्येकी रोख एक हजार रुपये,सोळा ते वीस क्रमांकास प्रत्येकी रोख नऊशे रुपये क्रमांक 21 ते 30 प्रत्येकी रोख साडेसातशे रुपये
याशिवाय उत्तेजनार्थ म्हणून 7, 9, 11, 13 व 15 वर्षाखालील मुलांना व साठ वर्षावरील उत्कृष्ट जेष्ठ बुद्धिबळपटूंना,उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटूंना,उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटूंना,उत्कृष्ट बिगर गुणांकनप्राप्त बुद्धिबळपटूना व उत्कृष्ट सर्वात लहान बुद्धिबळपटूंना रोख रक्कम,चषक व मेडल स्वरूपात एकूण 111 उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट तीन सहभागी अकॅडमीज् ना प्रोत्साहनात्मक विशेष बक्षीस ठेवले आहे. रोख व उत्तेजनार्थ मिळून एकूण 141 बक्षिसे आहेत.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी साडेसातशे रुपये प्रवेश शुल्क ठेवले आहे.तरी इच्छुक बुद्धिबळपटूंनी आपली नावे 13 फेब्रुवारी पर्यंत विझार्ड चेस क्लब, राजारामपुरी नववी गल्ली, कोल्हापूर, अथवा खालील व्यक्तीकडे प्रवेश शुल्क सह नोंदवावीत व अधिक माहिती घ्यावी असे स्पर्धा संयोजक अमोल देशपांडे, धीरज वैद्य, अनिश गांधी, सुरज वैद्य व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले व मनिष मारुलकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
1) आरती मोदी – 8149740405
2) धीरज वैद्य’- 9823127323
3) अनिश गांधी – 9096534074
4) मनिष मारुलकर – 9922965173
5) उत्कर्ष लोमटे – 9923058149
6) प्रीतम घोडके – 8208650388
7) रवींद्र निकम – 9371460068
8) रोहित पोळ – 9657333926
9) अभिजीत चव्हाण – 8888444346

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…