
no images were found
राज्यातील २१५ साखर कारखान्यांनी मागितला गाळप परवाना
मुंबई : महाराष्ट्रात यंदा गाळप करणार्या४ कारखान्यांच्या संख्येचा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. यंदा तब्बल २१५ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला असून, आता पर्यंत १६५ कारखान्यांना साखर आयुक्तालयाने परवाना दिला आहे. काही कारखान्यांच्या गाळप परवान्याचा प्रश्न साखर आयुक्तालयाच्या विचाराधीन असून, त्यावर निर्णय झाल्यावर अंतिम चित्र स्पष्ट होईल.
राज्यात गेल्या हंगामात २०५ साखर कारखान्यांनी गाळपासाठी साखर आयुक्तालयाकडे अनुमती मागितली होती. यंदा त्यात आणखी १० साखर कारखान्यांची भर पडली आहे. यंदा परवानगी मागणार्याी कारखान्यांपैकी १६ कारखाने गेल्या हंगामात बंद होते. त्यांनीही या हंगामासाठी परवाना मागितला आहे. या १६ पैकी १० सहकारी कारखाने आहेत. तर सहा खासगी कारखाने आहेत. हे कारखाने अहमदनगर, सोलापूर व औरंगाबाद विभागातील आहेत. यंदा या भागात मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने उसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यातील बहुतेक कारखाने खासगी प्रवर्तकांनी भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतले आहेत.
साखर आयुक्तालयाने यंदा परवानाविषयक धोरण कडक केले आहे. परवान्याशिवाय गाळप करणार्यान कारखान्यांना त्यांनी गाळप केलेल्या उसाला प्रतिटन ५०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. याशिवाय ज्या कारखान्यांनी गतहंगामात उत्पादकांची बिले चुकती केलेली नाहीत, त्यांचे परवाने रोखून धरण्यात आले आहेत.
कारखाना गाळप परवाना सद्यस्थिती अशी : गाळप परवाना मिळालेले कारखाने १६५, सहकारी कारखाने ८४,खासगी कारखाने ८१, गाळप सुरू झालेले कारखाने ९३, सहकारी कारखाने ४६,खासगी कारखाने ४७.