no images were found
लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून भाजपचं संघटन मजबूत होईल-माजी मंत्री बाळा भेगडे
कोल्हापूर: केंद्रातील मोदी सरकारच्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी सुरू करण्यात आलेल्या लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून भाजपचं संघटन मजबूत होईल असा विश्वास राज्य लोकसभा प्रवास योजनेचे संयोजक माजी मंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केला, कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदार संघाचा विचार करून लोकसभा प्रवास योजना तयार करण्यात आली असून यामधून राज्यभरातील भारतीय जनता पक्षाचा संघटन मजबूत होणार आहे यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया लवकरच कोल्हापुरात येणार आहेत, राज्यातील 18 लोकसभा मतदारसंघात ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून 12 नोव्हेंबरला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापुरात येणार असल्याचं बाळा भेगडे यांनी यावेळी सांगितलं.पत्रकार परिषदेला माजी आमदार अमल महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव,ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, विजयसिंह खाडे पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.