no images were found
कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर; सर्वत्र रणधुमाळी रंगणार
मुबई : राज्यातील ७७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला पार पडेल.
राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच मोठी निवडणूक गावपातळीवर पार पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्हें बर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. ३१ मी २०२२ पर्यंत अस्तिवत्वाात असलेली मतदार यादी गृहित धरण्यात आली आहे. जिल्ह्या तील ४७५ ग्रामपंचायतींची निवडणूक महिनाभरात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात १, नोव्हेंबर महिन्यात ४२९ तर डिसेंबर महिन्यामध्ये ४५ ग्रामपंचायतीचा कालावधी संपणार आहे. मुदती संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील १२ तालुक्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे : करवीर ५३,कागल २६, पन्हाळा ५०, शाहूवाडी ४९, हातकणंगले ३९ , शिरोळ १७, राधानगरी ६६, गनबावडा २१,गडहिंग्लज ३४, आजरा ३६ , भुदरगड ४४, चंदगड ४०.