Home मनोरंजन ‘हुई गुम यादें – एक डॉक्टर, दो जिंदगियां’ मालिकेतील करूणामूर्ती डॉ. देवची व्यक्तिरेखा जिवंत करताना माझ्या बहिणींकडून मला प्रेरणा मिळाली: इकबाल खान

‘हुई गुम यादें – एक डॉक्टर, दो जिंदगियां’ मालिकेतील करूणामूर्ती डॉ. देवची व्यक्तिरेखा जिवंत करताना माझ्या बहिणींकडून मला प्रेरणा मिळाली: इकबाल खान

17 second read
0
0
23

no images were found

‘हुई गुम यादें – एक डॉक्टर, दो जिंदगियां’ मालिकेतील करूणामूर्ती डॉ. देवची व्यक्तिरेखा जिवंत करताना माझ्या बहिणींकडून मला प्रेरणा मिळाली: इकबाल खान

      सोनी सबवर लवकरच ‘हुई गुम यादें – एक डॉक्टर, दो जिंदगियां’ ही मालिका सुरू होत आहे, ज्यामध्ये एका डॉक्टरची हृद्य कहाणी सांगितली आहे. या डॉक्टरची स्मृती गेल्यामुळे त्याचे आयुष्य बदलले आहे. आणि या प्रक्रियेत आपल्या रुग्णांकडे बघण्याची त्याची दृष्टी केवळ वैद्यकीय न राहता अधिक माणुसकी आणि करुणा त्याच्यात आली आहे. डॉ. देव (इकबाल खान) आपला भविष्यकाळ पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेच, पण तसे करताना हळूहळू त्याच्या हे लक्षात येऊ लागले आहे की, एका डॉक्टरकडे करुणाभाव असणे किती आवश्यक आहे.

     इकबाल खानसाठी, डॉ. देवची भूमिका करण्याचा प्रवास खूप वैयक्तिक आहे. या व्यक्तिरेखेसाठी तयारी करत असताना आपल्या घरातूनच त्याने प्रेरणा शोधली. त्याच्या दोन्ही बहिणी डॉक्टर असल्यामुळे केवळ औषधे लिहून देणे आणि तपासण्या करवून घेणे याच्या पलीकडे वैद्यकीय शास्त्राचा काय अर्थ आहे, हे त्याने जवळून पाहिले आहे. आपल्या बहिणींना त्याने अगदी हतबल, गर्भगळीत झालेल्या लोकांना सावरताना पाहिले आहे आणि त्यावरून त्याच्या हे ध्यानात आले आहे की, करुणा हे बऱ्याचदा एका डॉक्टरसाठी एक सशक्त साधन असते.

     इकबालने सांगितले की, आपल्या बहिणी त्यांच्या कामात किती करुणा आणतात, किती लक्षपूर्वक लोकांचे म्हणणे ऐकून घेतात, त्यांचे निरीक्षण करतात आणि रुग्णांना आधार देतात, खास करून ते घाबरलेले असताना हे त्याने पाहिले आहे. डॉ. देवची भूमिका करत असताना हा करुणाभाव त्याच्या मदतीस आला. कारण ही अशी भूमिका आहे, जेथे ही व्यक्तिरेखा स्वतःचा आणि आपल्या आसपासच्या विश्वाचा शोध घेत आहे.

     या प्रभावाविषयी बोलताना इकबाल खान म्हणतो, “माझ्या दोन्ही बहिणी डॉक्टर आहेत आणि त्या आपल्या रुग्णांच्या बाबतीत किती करुणा, आपलेपणा दाखवतात हे मी पहिल्यापासून पाहिले आहे. त्या आपल्या रुग्णांचे म्हणणे किती शांतपणे ऐकून घेतात, त्यांना तणावाच्या क्षणी आधार देतात हे पाहिले आहे. माझी बहीण सबिना ऑस्ट्रेलियात असते आणि रुग्णाशी बोलताना ती खूप जागरूक, एकाग्र असते. ती रुग्णाची केवळ लक्षणे बघत नाही, तर त्याच्या भावना, आसपासची परिस्थिती याचाही अंदाज घेत असते. डॉ. देवच्या भूमिकेची तयारी करताना मी तो शांतपणा, आश्वासक भाव जाणीवपूर्वक आणण्याचा प्रयत्न केला आहे. तो कसा बोलतो, कसा ऐकतो आणि शांतपणे प्रतिक्रिया देतो यावर काम केले आहे. मला हे जाणवले आहे की, डॉक्टर होणे म्हणजे केवळ तुमच्यातले वैद्यकीय कौशल्य विकसित करणे नाही, तर त्यात करुणेचा भाव खूप महत्त्वाचा आहे. माझ्या प्रत्येक दृश्यात हा भाव आणण्याचा मी प्रयत्न केला आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…