no images were found
स्वच्छता मोहिमेत 25 टण प्लास्टिक, तणकट व खरमाती उठाव
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी आज स्वच्छता मोहिम अभियान राबविण्यात आली. हि स्वच्छता मोहिम महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 25 टण खरमाती, कचरा प्लॅस्टिक, तणकट व इतर कचरा गोळा करण्यात आला.
हि स्वच्छता मोहिम राजारामपूरी मारुती मंदीर चौक ते सायबर चौक ते शेंडापार्क चौक या परिसरात राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मुख्य रस्ते, फूटपाथ वरील तनकट, खरमाती, प्लास्टिक व कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेसाठी 1 ट्रॅक्टर 1 जेसीबी व 1 डंपरचा वापर करण्यात आला.
या मोहिमेत गटतेने सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, रोहित कवाळे, सतीश पोवार, उमेश पोवार, नगरसेविका सौ.सृष्टी जाधव, सौ.धनश्री कोरवी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक शुभांगी पोवार, मनोज लोट, महापालिका आरोग्य विभागाचे 30 कर्मचारी व नागरीकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.