Home Uncategorized चीज ॲनालॉगबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून निर्देश जारी

चीज ॲनालॉगबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून निर्देश जारी

8 second read
0
0
6

no images were found

चीज ॲनालॉगबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून निर्देश जारी

कोल्हापूर,  : राज्यातील काही रेस्टॉरंट/कॅटरर्स/हॉटेल्स/फास्ट फुड विक्रेत्यांकडून चीज अॅनालॉग अन्न पदार्थाचा वाढता वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांची दिशाभूल होवू नये आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित व्हावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्वाचे निर्देश जारी केले आहेत.

       चीज अॅनालॉग हा अन्न पदार्थ दुधाव्यतीरिक्त स्टार्च इमल्सी फायर इ. वापरुन तया केला जातो. दिसायला तो पनीर किंवा चिज सारखा असला तरी पनीर किंवा चीज मानला जात नाही. रेस्टॉरंट/कॅटरर्स/हॉटेल्स/फास्ट फुड विक्रेते या आस्थापनांमध्ये ते पनीर ऐवजी चीज अॅनालॉगचा वापर करुन अन्न पदार्थ तयार करीत असतील तर त्याचा मेन्युकार्ड/इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड इत्यादींवर स्पष्ट उल्लेख नमूद करणे आवश्यक आहे.
       तसेच ग्राहकांनी पनीर खरेदी करताना पॅकबंद उत्पादनावरील लेबल काळजीपूर्वक वाचून त्यावर अॅनालॉग असा उल्लेख आहे का ते तपासावे.
       ग्राहकांच्या आरोग्याशी निगडीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कटीबद्ध आहे. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा मानके 2006 अंतर्गत संबंधिताविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे पाटील राज्य यांनी दिले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

गोकुळची आगामी निवडणूक महायुती एकत्र लढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णय

गोकुळची आगामी निवडणूक महायुती एकत्र लढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत …