Home स्पोर्ट्स बुद्धिबळातील मुली. महाराष्ट्राचा अभिमान! संघाचे प्रशिक्षक रोहित पोळ महाराष्ट्र उपविजेता.

बुद्धिबळातील मुली. महाराष्ट्राचा अभिमान! संघाचे प्रशिक्षक रोहित पोळ महाराष्ट्र उपविजेता.

7 second read
0
1
50

no images were found

बुद्धिबळातील मुली. महाराष्ट्राचा अभिमान! संघाचे प्रशिक्षक रोहित पोळ महाराष्ट्र उपविजेता.
कोल्हापूर (प्रतिनिधी):झारखंड राज्यातील रांची येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित संपन्न झालेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय अंडर-14 मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत (2025–26) महाराष्ट्र उपविजेते महाराष्ट्राच्या लेकींनी केवळ डाव जिंकले नाहीत…
      तर संयम, आत्मविश्वास आणि बुद्धीची ताकद देशासमोर सिद्ध केली.या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक पटकावत राज्याचा मान उंचावला.ही केवळ पदकाची गोष्ट नाही — ही आहे संघभावना, शिस्त आणि संघर्षातून घडलेली यशोगाथा.महाराष्ट्र संघातील प्रेरणादायी खेळाडू (सातारा). कु. घाटे तन्मयी (कर्णधार)
संघाची आधारस्तंभ! ,कु. परदेशी चतुर्थी,(पुणे), कु. प्रणिता भावा (मुंबई), कु. गांधी परिधी (अमरावती),
कु. सानवी दत्तात्रय गोरे (बार्शी) ५व्या बोर्डवर प्रथम क्रमांक (सुवर्णपदक – बोर्ड पुरस्कार) पटकावत तिने सिद्ध केले की मेहनत, धैर्य आणि विश्वास यांचा मेळ यश नक्की देतो.

    या यशामागील शिल्पकार मुलींच्या संघाचे प्रशिक्षक श्री. रोहित महादेव पोळ सर(इचलकरंजी – कोल्हापूर),संघ व्यवस्थापक वैष्णवी मॅडम,तसेच संपूर्ण मार्गदर्शक टीमने दिलेले योग्य नियोजन व पाठबळ या यशाचे मजबूत आधारस्तंभ ठरले.या लेकींच्या प्रत्येक विजयामागे उभे असलेले पालकांचे संयम, प्रशिक्षक भूमिका , जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर आणि महाराष्ट्र राज्य चे प्रोत्साहन
आज या यशरूपाने साकार झाले आहे.
       योगयोग असा की तामिळनाडू येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय अंडर-14 मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत (2023–24)महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक रोहित पोळ होते व त्यावेळी महाराष्ट्र उपविजेतेपद मिळवले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…