Home Uncategorized कौशल्यांच्या कक्षा वाढविण्याची गरज – डॉ.शिरीष शितोळे

कौशल्यांच्या कक्षा वाढविण्याची गरज – डॉ.शिरीष शितोळे

0 second read
0
0
26

no images were found

कौशल्यांच्या कक्षा वाढविण्याची गरज – डॉ.शिरीष शितोळे

कोल्हापूर(प्रतिनिधी) : प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (पीएम.उषा ) शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर शिक्षणशास्त्र अधिविभाग येथे शिक्षक व प्राध्यापकांसाठी “अनुभवाधारित अध्यापनशास्त्र” या विषयावर दिनांक २९ व ३० डिसेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती व कार्यशाळेचे व्याख्याते महावीर महाविद्यालय ,कोल्हापूर येथील डॉ.शिरीष शितोळे यांनी “उच्च शिक्षणातील आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी विचार प्रक्रियेमध्ये जुन्या – नव्या कौशल्यांच्या कक्षा वाढविण्याची गरज” असल्याचे महत्व विषद केले.

शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.चेतना प्र.सोनकांबळे यांनी “आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये अनुभवाधारित अध्यापनशास्त्र शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व उपयुक्त”असल्याचे सांगितले. प्रस्तुत कार्यशाळेच्या समन्वयक डॉ.रुपाली संकपाळ यांनी प्रास्ताविक केले व सदर कार्यशाळेचा हेतू विषद केला.

प्रस्तुत कार्यशाळेसाठी डॉ.अंजली गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सुत्रसंचालन बी.एड .एम .एड प्रशिक्षणार्थी पूजा कांडपाल यांनी केले. आभार श्रीमती कादंबरी खांडेकर यांनी व्यक्त केले.

कार्यशाळेसाठी डॉ.विद्यानंद खंडागळे, डॉ. सुप्रिया पाटील श्रीमती सरस्वती कांबळे, श्रीमती सारिका पाटील व डॉ.विजय सदामते व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील शिक्षक ,प्राध्यापक यांनी कार्यशाळेसाठी सहभाग नोंदविला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…