Home स्पोर्ट्स खुल्या नऊ वर्षाखालील *केन बुद्धिबळ विजेता 2025 इचलकरंजी बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात प्रारंभ

खुल्या नऊ वर्षाखालील *केन बुद्धिबळ विजेता 2025 इचलकरंजी बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात प्रारंभ

1 second read
0
0
65

no images were found

खुल्या नऊ वर्षाखालील *केन बुद्धिबळ विजेता 2025 इचलकरंजी बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात प्रारंभ
*लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आणि केन चेस अकादमी इचलकरंजी आयोजित*
*नऊ वर्षाखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेस उत्साहात प्रारंभ;अवनीश, आदित्यराज,शिवांश, अनिरुद्ध व रिधान आघाडीवर*

सोमवार (प्रतिनिधी) :- चेस असोसिएशन कोल्हापूर व चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आणि केन चेस अकादमी इचलकरंजी आयोजित नऊ वर्षाखालील खुल्या मुला मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा *केन बुद्धिबळ विजेता २०२५** लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी च्या सभागृहामध्ये आज मोठ्या उत्साहात सुरू झाल्या .
बेळगाव,सिंधुदुर्ग,सांगली, कोल्हापूर,जयसिंगपूर, निपाणी,गडहिंग्लज व स्थानिक इचलकरंजी
मधील एकूण 100 नामांकित बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्विस् लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय नियमानुसार खुल्या नऊ वर्षाखालील मुलांमुलींच्या गटात एकूण आठ फेऱ्यात ही स्पर्धा होत आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी चे अध्यक्ष संदीप सुतार आणि सचिव सचिन येलाजा यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक कृष्णावतार भराडिया, रेश्मा नलवडे (शाळेत बुद्धिबळ -वरिष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक महाराष्ट्र ), करण परीट (वरिष्ठ राष्ट्रीय पंच) व विजय सलगर (राज्य पंच) करण दबडे (आंतरराष्ट्रीय रेटिंग खेळाडू ) यांच्यासह बुद्धिबळपटू व पालक उपस्थित होते. केन चेस अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक रोहित पोळ ( वरिष्ठ राष्ट्रीय पंच) यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन केले.
आज झालेल्या पाचव्या फेरीनंतर अवनीश जितकर कोल्हापूर , आदित्यराज निंबाळकर गडहिंग्लज हे दोघ पाच गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत तर
शिवांश सुतार इचलकरंजी,अनिरुद्ध साळुंखे सांगली व रिधान कलघटगी बेळगाव हे तिघेजण साडेचार गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. आयोजका कडुन सर्व खेळाडूना नाश्ताची सोय सुप्रसिद्ध श्रीराम इडली दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …