Home राजकीय राष्ट्रवादी आक्रमक, अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानावर दगडफेक

राष्ट्रवादी आक्रमक, अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानावर दगडफेक

0 second read
0
0
221

no images were found

राष्ट्रवादी आक्रमक, अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानावर दगडफेक

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मंत्री सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी घरावर दगडफेकही केली. यात खिडक्यांच्या दरवाजाच्या काचा फुटल्या. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

यावेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माफी काफी नाही, सत्तारांनी राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल, असा इशारा चव्हाण यांनी यावेळी दिला. महिलांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा चव्हाण यांनी यावेळी दिला. दरम्यान सत्तार यांना आपला आक्षेपार्ह शब्द मागे घेण्यासाठी २४ तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. तर पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Load More Related Articles

Check Also

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम उत्साहात

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम उत्साहात &nbs…