Home मनोरंजन ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत विराटने अन्विताचे अपहरण केल्याने लग्नात गोंधळ माजला

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत विराटने अन्विताचे अपहरण केल्याने लग्नात गोंधळ माजला

7 second read
0
0
30

no images were found

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत विराटने अन्विताचे अपहरण केल्याने लग्नात गोंधळ माजला

 मुंबई, : सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ ही मालिका प्रेक्षकांना त्यातील आशा, प्रेम आणि कौटुंबिक नातेसंबंधांमुळे आकर्षित करते. ही अन्विता (सुंबुल तौकीर खान)ची कहाणी आहे, जिने पहिल्यापासून आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला आहे आणि प्रत्येक संकटात आपले वडील सुहास (वरुण बडोला) आणि भावंडे यांना आधार दिला आहे. तिच्या या प्रवासात दोन अत्यंत भिन्न प्रकृतीच्या पुरुषांचा तिच्यावर वैयक्तिक प्रभाव आहे. यापैकी एक आहे विराट (रजत वर्मा), ज्याचे स्थिर प्रेम तिला बळ देते आणि संजय (ऋषी सक्सेना) ज्याचे छुपे हेतू तिचे जग उधळून देऊ शकतात. यातच तिची आई हेतल (नेहा एस के मेहता) आपल्या असंबद्ध वागण्याने कथानकात अनपेक्षित ट्विस्ट निर्माण करते. तर, संजयची आई माधुरी (उत्कर्षा नाईक) एक नवीन तणाव घेऊन आली आहे, कारण अन्विताला आपल्या कुटुंबात सामावून घेणे तिला त्रासदायक वाटत आहे.

      आगामी भागांमध्ये, सुहास, चिडिया (अन्विताची बहीण) आणि हेतल विराटला अन्विताच्या विवाह स्थळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण संजयने उभ्या केलेल्या सुरक्षेमुळे त्यांना यश येत नाही. आणि जेव्हा विराट पोहोचतो, तेव्हा विवाह सोहळा पार पडलेला असतो. हा विवाह अमान्य करत विराट अन्विताचे अपहरण करतो आणि तिला आपल्या फार्महाऊसवर घेऊन जातो. इथे पोहोचल्यावर ती त्याला बोल लावते, थप्पड मारते आणि त्याला सांगते की, त्याने तिला असे निराधार सोडून जायला नको होते. ती त्याला सांगते की त्याच्या जाण्यामुळे काय काय समस्या उभ्या राहिल्या आणि त्यावेळी संजयने तिला कसा भक्कम आधार दिला.

विराट पुन्हा समोर आल्यानंतर आता अन्विता संजय आणि आपल्या भावंडांसोबत पुढचे आयुष्य जगू शकेल का?

विराटची भूमिका करणारा रजत वर्मा म्हणतो“विराटसाठी हा कथाभाग खूप अटीतटीचा आहे. आपला भावनावेग आणि उद्वेग यामुळे तो अनपेक्षित वागतो. प्रेम, पश्चात्ताप आणि स्वतःने केलेल्या चुका यांनी त्याचे जीवन ग्रासले आहे. या संघर्षाने प्रेरित होऊन तो अनपेक्षित कृत्ये करत आहे. प्रेक्षकांना विराटची खूप हळवी बाजू यावेळी दिसेल. त्याला पाहताना प्रेक्षकांना हा प्रश्न पडेल की, प्रेमासाठी एखादा माणूस कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतो? मला वाटते, प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा देखील वाढली आहे. हा नाट्यमय प्रवास ते आमच्यासोबत करत असल्याचा मला आनंद वाटतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…