Home राजकीय ‘आता चित्रा वाघ गप्प का?’; उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं

‘आता चित्रा वाघ गप्प का?’; उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं

1 second read
0
0
314

no images were found

‘आता चित्रा वाघ गप्प का?’; उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं

मुंबई : उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शा‍ब्दिक युद्ध सुरू आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीची पोलिसांत आणि महिला आयोगाकडे तक्रार देखील केली होती. यावर उर्फीने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिली आहेत. त्यांच्यातील हा वाद आता चित्रा वाघ, उर्फी जावेद यांच्यापुरताच न राहता त्यामध्ये आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचाही समावेश झाला आहे.
उर्फीने भाजपच्या एका महिला नेत्याने पक्ष सोडला त्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. भाजपच्या तामिळनाडू राज्यातील नेत्या आणि अभिनेत्री गायत्री रघुराम यांनी भाजप पक्षाला रामराम केला आहे. गायत्री यांनी सांगितले की, भाजप पार्टी महिला सुरक्षित नाहीत,म्हणून मी पार्टी सोडत आहे असं कारण त्यांनी पक्ष सोडताना दिलं आहे. उर्फी जावेदने त्यांची ही बातमी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला आहे. उर्फीने लिहिले आहे की, ‘आता चित्रा वाघ गप्प का आहेत! यांचे तर कपडे सुद्धा चांगले आहेत. तुमच्याच पार्टीतील लोकांमुळे हे झाले आहे! जिथे आवाज उठवायला हवा तिथे आवाज नाही उठवणार’ असं म्हणत तिने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

देशातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न चिंताजनक-डॉ.हुलगेश चलवादी

देशातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न चिंताजनक-डॉ.हुलगेश चलवादी : विरोधकांनी राजकारण टाळ…