Oplus_131072
no images were found
येत्या शुक्रवारी एमपीएससीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
कोल्हापूर, : महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत जिल्ह्यातील मुला-मुलींनी मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सत्कार कार्यक्रम व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबद्दल मार्गदर्शन आयोजित केले आहे. शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राधानगरी-कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी केले आहे.