Home शासकीय प्रारुप मतदार यादीच्या कामाचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावा

प्रारुप मतदार यादीच्या कामाचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावा

25 second read
0
0
33

no images were found

प्रारुप मतदार यादीच्या कामाचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावा

कोल्हापूर (प्रतिनिधी ): महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी तयार करण्यात येणा-या प्रारुप मतदार यादीच्या कामकाजाचा आढावा आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला.  या बैठकीस चारही विभागीय कार्यालयातील नियंत्रण अधिकारी व सह.नियंत्रण अधिकारी उपस्थित होते.

            या बैठकीत प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाची माहिती घेऊन प्रारुप मतदार यादीची उर्वरीत कामे लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना सर्व नियंत्रण अधिका-यांना दिल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभा मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी वापरण्यात येणार आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदार यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या.

            प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना संबधीत प्रभागाच्या हद्दी लक्षात घेऊन अचूक विभाजन करण्यात यावे. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झालेनंतर दुबार नावे असल्यास त्याची खातरजमा करुन आयोगाच्या निर्देशानुसार मतदाराचे नांव एकापेक्षा जास्त प्रभागात आल्यास तो मतदार कोणत्या प्रभागात मतदान करणार आहे याबाबत लेखी घ्यावे अशा सूचना सर्व नियंत्रण अधिका-यांना दिल्या.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, सामाजिक विशेषतज्ञ युवराज जबडे उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत …