Home राजकीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कोल्हापुरात अभिनव ‘विडंबनात्मक’ आंदोलन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कोल्हापुरात अभिनव ‘विडंबनात्मक’ आंदोलन

11 second read
0
0
39

no images were found

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कोल्हापुरात अभिनव ‘विडंबनात्मक’ आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी): देशात सातत्याने वाढणारे पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस आणि सोन्याचे दर यांविरोधात आज कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक आगळेवेगळे आणि अनोखे विडंबनात्मक आंदोलन करण्यात आले. शहरप्रमुख मंजित माने यांच्या नियोजनातून आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणांवर अत्यंत उपरोधिक आणि शैलीदार पद्धतीची टीका करण्यात आली.

        आंदोलनादरम्यान एका वैशिष्ट्यपूर्ण दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात बैलजोडीसमोर उभ्या असलेल्या एका तरुणाला चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यंगचित्राचा मुखवटा लावण्यात आला होता. या अनोख्या सादरीकरणासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी हातात विविध उपहासात्मक संदेश लिहिलेले फलक धरून जोरदार निदर्शने केली.

     शिवसैनिकांच्या हातातील फलकांवर ‘सोने खरेदी करू नका, लोखंड खरेदी करा’, ‘पेट्रोल-डिझेल दरवाढीचे अभिनंदन’ आणि ‘प्रवास टाळा’ अशा आशयाचे तीव्र उपरोधिक संदेश झळकत होते..

      या आंदोलनादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक विडंबनात्मक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनात वाढत्या महागाईचा दाखला देत, नागरिकांनी लग्न, मुंज, वास्तूशांती यांसारख्या कौटुंबिक कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळावा, असा उपरोधिक सल्ला देण्यात आला. 

      तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन न करता उलट सरकारचे स्वागत करावे, असा टोलाही या निवेदनातून लगावण्यात आला.या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख मंजित माने, विराज पाटील, राजू यादव, हर्षल पाटील, विकी मोहिते यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर सौ. रूपाराणी निकम

शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर सौ. रूपाराणी निकम कोल्हापूर,&nb…