no images were found
कोल्हापूर विमानतळयेथे नाईट लँडिंग सेवा सुरू
कोल्हापूर : येथील बहुप्रतिक्षित कोल्हापूर विमानतळाच्या आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरु होणार आहे. त्यामुळे विमानतळ विकासाच्या प्रकियेतील मैलाचा टप्पा पार होणार आहे. आजपासून नाईट लँडिंग सुविधा कार्यरत करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळ २४ तास सेवेत कार्यरत असेल.
जागा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. विस्तारीकरणानंतर धावपट्टी १७८० मीटर झाली आहे. या धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. धावपट्टीवर मार्किंगही करण्यात आले आहे. विस्तारित धावपट्टी पूर्ण क्षमतेने वापरता येणार आहे.
राज्य सरकारकडून धावपट्टी विस्तारित झाल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी असलेले विमानाला कोल्हापूर विमानतळावर लँडिंग, टेक ऑफ करता येणार आहे. तसेच तीन एटीआर आणि एक एअरबस थांबवण्याची व्यवस्था झाली आहे. धावपट्टीवरील विमानांना योग्य दिशा दाखवण्यासाठी, धुक्यामध्ये लँडिंग, टेक ऑफसाठी मदत करणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास डीजीसीएकडून परवानगी दिली असल्याची माहिती कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी दिली दिली आहे.
अतिरिक्त ६४ एकर जागेच्या भूसंपादन प्रक्रियेला गती आली आहे. संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी अंतिम दर जाहीर करून देय असणाऱ्या रकमेच्या १०४८ जणांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता जमीन संपादनासाठी संबंधित जागा मालकांकडून संमती पत्रे देण्यात येत आहेत. आतापर्यंत 300 हून अधिक जाणानी संमती पत्रे दिली आहेत.