no images were found
लव्ह जिहाद प्रकरणी मुलीसह तरुणास पकडले
कोल्हापूर : येथील लव्ह जिहाद प्रकरणातील बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी अखेर सापडली आहे. कोल्हापूर पोलिसांनी बेपत्ता अल्पवयीन मुलीसह तिला फूस लावून पळून गेलेल्या मुलाला शोधून काढलं आहे.दोघांनाही कर्नाटकातील संकेश्वरमधून ताब्यात घेण्यात आलंय. विशेष म्हणजे या प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी सकाळीच आंदोलन केलं होतं. त्यानंतर आज पोलिसांनी अल्पवयीन मुलगी आणि तिला घेऊन जाणाऱ्या तरुणाला शोधून काढलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि तरुणाला लव्ह जिहाद प्रकरणी सकाळी कोल्हापुरात आणलं जाणार आहे.
कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून संबंधित प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय. विशेष म्हणजे या प्रकरणामुळे कोल्हापुरातील वातावरण देखील तापलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी ठोस कारवाई करावी यासाठी काही हिंदुत्ववादी संघटनानी काल पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. कोल्हापूर पोलिसांनी मुलीचं अपहरण करणाऱ्या संशयित तरुणाचा फोटो जाहीर केला होता. संबंधित तरुण कुठे दिसल्यास तातडीने संपर्क करावा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना काल संध्याकाळी कर्नाटकातील संकेश्वरमधून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलगी दिवाळीआधी परीक्षेला गेली होती. पण पेपर संपल्यानंतरही ती घरी परतली नव्हती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला होता. पण मुलगी कुठेच सापडत नसल्याने कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. या दरम्यान एक मुस्लिम तरुणही बेपत्ता झाला होता. त्यामुळे या प्रकरणाला लव्ह जिहादचं वळण लागलं होतं. संबंधित प्रकरण गेल्या १५ दिवसांपासून चर्चेला कारण ठरलं होतं.