Home आरोग्य गुंतागुंतीच्या मुत्ररोग समस्येवर एस हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वापरलेल्या नवीन रोबोटिक सर्जिकल तंत्राची आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत नोंद

गुंतागुंतीच्या मुत्ररोग समस्येवर एस हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वापरलेल्या नवीन रोबोटिक सर्जिकल तंत्राची आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत नोंद

12 second read
0
0
35

no images were found

गुंतागुंतीच्या मुत्ररोग समस्येवर एस हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वापरलेल्या नवीन रोबोटिक सर्जिकल तंत्राची आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत नोंद

कोल्हापूर , : ज्येष्ठ मुत्ररोग तज्ञ व एस हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.सुरेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली मुत्ररोग तज्ञ डॉ.गुरूराज पडसलगी,डॉ.सचिन भुजबळ, डॉ.सौरभ उपलेंचवार यांनी नुकतेच मुत्रपिंडासंबंधी गुंतागुंतीच्या परिस्थितीवर रोबोटिकच्या साहाय्याने लॅप्रोस्कोपिक पायलोलिथुमी आणि बक्कल म्युकोसल ग्राफ्ट (बीएमजी) या एकाच वेळी दोन प्रक्रिया केल्या.हे नवीन तंत्र गुंतागुंतीच्या मुत्रपिंडाच्या स्थितीत रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. शास्त्रीय नियतकालिकेमध्ये प्रकाशित होणारी अशा प्रकारची जगातील ही पहिलीच रोबोटिक शस्त्रक्रिया आहे.याबाबतचा निबंध नुकताच जर्नल ऑफ रोबोटिक सर्जरी जर्मनी येथे प्रकाशित झाला.

        याबाबत माहिती देताना एस हॉस्पिटल,एरंडवणे पुणे चे अध्यक्ष प्रा.डॉ.सुरेश पाटणकर म्हणाले की, काही काळापूर्वी आमच्या रूग्णालयात पोटदुखीची तक्रार घेऊन 41 वर्षीय पुरूष रूग्ण आला होता. निदानामध्ये त्यांचे मुत्रपिंड शरीरातील सामान्य नैसर्गिक ठिकाणीऐवजी ओटीपोटात असल्याचे आढळून आले. या स्थितीला एक्टोपिक किडनी असे म्हणतात आणि ही एक दुर्मिळ जन्मजात स्थिती असते. त्याशिवाय त्याला अनेक मुतखडे झाल्याचे आढळले आणि मुत्रपिंड व मुत्रवाहिनी जोडणाऱ्या भागात अडथळा निर्माण झाला होता. साधारणत: अशा असामान्य शरीर रचना आणि गुंतागुंतीचा धोका असलेल्या स्थितींवर उपचार करणे अत्यंत कठिण असते.

     एक्टोपिक किडनी ही या दुर्मिळ जन्मजात स्थितीमध्ये मुत्रपिंड व मुत्रवाहिनी जोडणाऱ्या भागात अडथळे तर असू शकतात परंतु मुतखडे सहसा आढळत नाहीत. असामान्य रचना,छोटी मुत्रवाहिनी,रक्तवाहिन्यांची गुंतागुंतीची स्थिती आणि नजिकचा आतड्यांचा परिसर यामुळे कुठलीही प्रक्रिया करणे आव्हानात्मक असते.लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही खुल्या शस्त्रक्रियेपेक्षा सुरक्षित मानली जाते आणि रूग्ण लवकर बरा होतो.मात्र तांत्रिकदृष्टया अशा स्थितीत ही प्रक्रिया कठिण आणि शल्यचिकित्सकांसाठी जास्त वेळ लागणारी ठरू शकते.ज्या रूग्णांना आधीपासून मुतखड्यांचा त्रास आहे,त्यांच्या मुत्रपिंडामध्ये व्रण आणि दाह त्रासदायक ठरू शकते.तसेच उतींना नाजूक बनू शकतो.त्यामुळे अशा प्रकारच्या स्थितीत टाके घातल्यामुळे  या उतींना नुकसान पोहचू शकतात आणि रक्तस्त्राव,संसर्ग आणि इतर गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो. याआधीच्या वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशी शस्त्रक्रिया दोन टप्प्यांत करण्याची शिफारस आहे,मात्र रोबोटिक तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील सुरक्षित,अधिक कार्यक्षम आणि रूग्ण व शल्यचिकित्सकांसाठी कमी तणाव निर्माण करणाऱ्या झाल्या आहेत.

      त्यामुळे एस हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने रोबोटिक शस्त्रक्रिया करायचे ठरविले,असे डॉ.पाटणकर म्हणाले, रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली वापरून मुतखडा काढण्याची आणि मुत्रपिंडातील बिघाड दुरूस्त करण्याची प्रक्रिया आम्हाला अचूकतेने एकाच वेळेस करता आली. मात्र अनेक मुतखडे आणि मुत्रमार्गाला याआधीच झालेल्या नुकसानामुळे ही प्रक्रिया आव्हानात्मक होती. अशा प्रकारची गुंतागुंतीची स्थिती हाताळण्यासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. मुतखडे काढण्याबरोबरच मुत्रपिंड आणि मुत्रवाहिका जिथे मिळते त्या भागात आकुंचन आणि कडकपणामुळे निर्माण झालेला अडथळा काढून टाकण्यासाठी तोंडातील गालाच्या आतील त्वचेचा थोडासा भाग काढून तिथे बसविण्यात आला.

      त्यानंतर रूग्णाची प्रगती जलदरित्या झाली आणि शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात आला. उपलब्ध वैद्यकीय साहित्याचे सविस्तर शोध घेत एक्टोपिक पेल्विक किडनी या स्थितीत अशा प्रकारची मुतखडे काढण्याची आणि त्याचवेळेस बक्कल म्युकोसल ग्राफ्ट (बीएमजी) याची कुठलीही नोंद नसल्याचे आढळून आले. आमचा हा दावा जर्नल ऑफ रोबोटिक सर्जरी या प्रतिष्ठित नियतकालिकेने मान्य करत ही प्रक्रिया प्रकाशित केली आहे.

      डॉ.पाटणकर पुढे म्हणाले की,एस हॉस्पिटलने आतापर्यंत कर्करोग व पुर्नबांधणी अशा प्रोस्टेट आणि किडनी संबंधी अनेक शस्त्रक्रिया  केल्या आहेत. मात्र ही शस्त्रक्रिया एक महत्त्वाचा टप्पा आहे. सर्वांत आव्हानात्मक स्थितीत रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने सुरक्षित व अचूक प्रक्रिया आपण करू शकतो,हे अधोरेखित करत मुत्रविज्ञानात परिवर्तन घडवत आहे. शस्त्रक्रिया करताना हालचालींमध्ये अधिक लवचिकता,त्रिमितीय प्रतिमा,सुधारित एर्गोनॉमिक्स व शल्यचिकित्सांच्या कौशल्यामुळे गुंतागुंतीच्या प्रक्रिया अचूकतेने केली जाऊ शकते. रूग्णांना याचे चांगले परिणाम मिळतात. शल्यचिकित्सकांच्या टीम मध्ये प्रा.डॉ.सुरेश पाटणकर यांच्यासह मुत्ररोग तज्ञ डॉ.गुरूराज पडसलगी,डॉ.सचिन भुजबळ, डॉ.सौरभ उपलेंचवार यांच्याबरोबर भूलतज्ञ डॉ.सोनाली वस्ते, डॉ.सुचिता हार्डिकर आणि डॉ.नेहा बनवट यांचा समावेश होता.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …