no images were found
अंगावर अॅसिड टाकून महिलेचा खून
चिपळूण : एका महिलेचा घरात कोणी नसताना अज्ञातांनी तिच्या अंगावर अॅसिड टाकून चेहऱ्यावर वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने कोकणाची सांस्कृतिक राजधानी असलेले चिपळूण हादरले आहे. मृत महिला ही आपल्या मुलासोबत पेठमाप येथे राहत होती.
सोमवारी तिचा मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे गेला असतानाच ही धक्कादायक घटना घडली आहे. कुलसूम अन्सारी अस मृत महिलेचे नाव असून चिपळूण पोलिसांनी श्वान पथकाच्या साहाय्याने खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तापसकाम सुरू केले आहे. दरम्यान मृत महिलेचा मुलगा हा आपल्या आईला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची आई फोन उचलत नव्हती. त्यावेळी मुलाने आपल्या मित्रांना घरी जाण्यासाठी सांगितले. ज्यावेळी मित्र घरी पोहोचले त्यावेळी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी घाबरलेल्या मित्रांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी घरात कुलसूम अन्सारी यांचा मृतदेह एका बाजूला झाकून ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. दरम्यान या महिलेचा खून हा चोरीच्या प्रयत्नात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी खरा खुनी कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांनी ऍसिड सदृश्य द्रव्याने जाळून करण्यात खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने खळबळ उडाली आहे.