Home सामाजिक न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उंचगाव येथे बुधवारी रोजगार वमेळाव्याचे आयोजन

न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उंचगाव येथे बुधवारी रोजगार वमेळाव्याचे आयोजन

7 second read
0
0
35

no images were found

न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उंचगाव येथे बुधवारी रोजगार वमेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर,: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उंचगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 2 यावेळेत न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर, शांतीनगर, उंचगाव येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.

       या मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील 10 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची 477 रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या तीन प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…