no images were found
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी निर्माल्यातून धूप उदबत्ती रांगोळी व इतर शोभेच्या:टाकावू पासून टिकावू वस्तू
इचलकरंजी (प्रतिनिधी):दिवाळी हा सण सर्वत्र मोठया आनंदाने साजरा केला जातो, दिवाळी म्हणजे धूप दिप यांची आरास अंगणात पणती लावून सुबक रांगोळी काढून सजावट. त्याचबरोबर घराची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या कलाकृतीचे आकाशदीवे लावले जातात. पण सध्या बाजारात दिवाळीसाठी पूजेसाठी लागणा-या विविध वस्तू या बनावटी आल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम सोसावे लागत आहेत. या सर्वांवर उपाय म्हणून डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी वेस्ट टू बेस्ट या थीमचा वापर करीत विविध सणांच्या निर्माल्यातून पडलेल्या फुलांपासून धूप उदबत्ती रांगोळी तसेच विविध प्रकारचे नैसर्गिक वस्तूंपासून साबण, तेल आणि रिकाम्या बॉटल पासून अकाशकंदिले व वेस्ट कापसापासून कापूस वात,पौते व कापडांपासून नैसर्गिक अकाशकंदील तयार केले आहेत.
दीवाळी सणाचे औचित्य साधत डीकेटीईच्या प्रथम वर्षच्या विद्यार्थ्यांनी एआयसीटीई आयडिया लॅब अंतर्गत विद्यार्थ्यांनी ‘वेस्ट टू बेस्ट’ या उपक्रमांतर्गत दिवाळीसाठी लागणारे विविध वस्तू बनविले आहे. या सर्व वस्तूंचे वैशिष्ठये म्हणजे या वस्तू हुबेहुब बाजारातील सर्व वस्तूंसारख्या दिसतात आणि बनविण्यास ही सोपे आहेत. निर्माल्य हे नदीत मिसळून पर्यावरणांची हानी होत आहे यामुळे हे निर्माल्य चांगल्या कामासाठी वापरले तर पर्यावरणाचा समतोल राखता येणार आहे आणि त्याचा चांगला उपयोग होवू शकते हे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. यामध्ये वापरलेल सर्व मटेरियल हे सहज घरच्या घरी उपलब्ध होत असून, धूप उदबत्ती साबण व इतर साहित्य मोकळया वेळेत व कमी खर्चात बनवू शकतो यामुळे सर्वसामन्यांची पैश्याची बचत होवून पर्यावरणचा समतोल राखण्यास देखील मोलाची साथ लाभणार आहे.
या सर्व वस्तू पूर्णपणे पारंपरिक असून स्वदेशी बनावटीच्या साहित्यापासून बनविलेले असून ग्राहकांना परवडेल अशा कमी किमतीत व दिसायला सुबक बनविलेले आहेत. धूप व उदबत्ती यांचा सुगंध चांगला असून टिकण्यास जास्त काळ राहू शकतात तसेच साबण हे पूर्णपणे औषधी वनस्पती कोरफड, लिंबाचा पाला व सुगंधी उटणे वापरुन तयार केले असल्यामुळे त्वचा मुलायम व त्वचा विकाराच्या व्याधी जाण्यास मदत होईल असा विद्यार्थ्यांचा दावा आहे. निर्माल्यापसून बनविलेल्या विविध कलरच्या रांगोळया हया आपल्या अंगणातील शोभा अधिक वाढविणार असून त्या देखील टिकण्यास चांगल्या आहेत असा विश्वास विद्यार्थ्यांचा आहे. जुन्या साडयांपासून देवाचे आसन व कॅपॉक फायबर पासून कापसाचे पौते, वाती व देवाचे दागिने या सर्व बनविलेल्या वस्तूंमुळे दिवाळी सणाचा आनंद द्विगणीत होणार आहे. मागील वर्षीच्या दिवाळीसाठी देखील विद्यार्थ्यांनी सौरउर्जेवरील पणत्या अकाशकंदील रांगोळी असे अनेक विविध वस्तू तयार केल्या होत्या ते सोलर दिवे आजही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मृणाल पाटील, पूजा पाटील, श्रेया पाटील, अनुषा रायबागी, झिनत गैबान, सानिका तवटे, आदिती धुमाळ, रुकया शेख, अनुज लुगडे, श्रेया भोसले, अश्विनी परिट, सानिका सावेकर, सार्थक जगताप या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडेे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या. दिवाळीचे सर्व साहीत्य तयार करण्यासाठी डायरेक्टर प्रा. डॉ सौ. एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा डॉ यु.जे. पाटील, विभागप्रमुख डॉ ए.के.घाटगे,आयडिया लॅबचे प्रा.डॉ. व्ही.डी.शिंदे, प्रा.सुयोग रायजाधव, प्रा.दिग्वीजय म्हामणे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.