Home आरोग्य महिलांमधील वंधत्वाच्या समस्येवर पीसीओएसचा वाढता प्रभाव – कोल्हापूरच्या नोवा आयव्हीएफ तज्ज्ञांचे सर्वेक्षण

महिलांमधील वंधत्वाच्या समस्येवर पीसीओएसचा वाढता प्रभाव – कोल्हापूरच्या नोवा आयव्हीएफ तज्ज्ञांचे सर्वेक्षण

14 second read
0
0
38

no images were found

महिलांमधील वंधत्वाच्या समस्येवर पीसीओएसचा वाढता प्रभाव – कोल्हापूरच्या नोवा आयव्हीएफ तज्ज्ञांचे सर्वेक्षण

कोल्हापूर- सप्टेंबर हा जागतिक स्तरावर PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) जागरूकता महिना म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने कोल्हापूरच्या नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी केंद्राकडून विशेष सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रजनन क्षमतेवर उपचार घेणाऱ्या महिलांमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची आढळून आले आहे.

     कोल्हापूरच्या नोव्हा आयव्हीएफ येथील प्रजनन तज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार प्रजनन क्षमतेच्या संबंधी समस्यांवर उपचाराकरिका केंद्रात दाखल होण्याऱ्या जवळपास २५ ते ३० टक्के महिलांना पीसीओएसचे निदान झाले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये या हार्मोनल स्थितीचा वाढता प्रसार दिसून येत आहे, या स्थितीच्या विकासात जीवनशैली झालेला बदल हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. हार्मोनची पातळी आणि ओव्हुलेशनवर परिणाम करणारी ही स्थिती महिला वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण ठरत आहे.

         प्रजनन तज्ज्ञ सांगतात की, पीसीओए हे चांगल्या दर्जाचे स्त्रीबीज तयार करण्याच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम करते, त्यासाठी वेळीच समुपदेशन आणि अनुकूल उपचार करणे आवश्यक आहे. जीवनशैलीतील

       योग्य बदल उपचारांच्या परिणामांमध्ये सकारात्मक बदल निर्माण करू शकतात. काही वेळेस १०% वजन कमी झाल्याने देखील मासिक पाळी नियमित होते आणि आहार तसेच नियमित व्यायाम हे दोन्ही पीसीओएस व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतात. पीसीओएसची सुरुवातीची लक्षणे असलेल्या किशोरवयीन मुलींनी किंवा हायपोथॅलेमिक-पिट्यूटरी-ओव्हेरियन (एचपीओ) संबंधित हार्मोनल असंतुलन असलेल्या मुलींनी भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी अल्ट्रासाऊंड, हार्मोनल चाचण्या किंवा एचपीओ ॲक्सिस चाचणी करावी असा सल्ला डॉ. इंद्रनील जाधव यांनी दिला.

        वेळीच उपचार आणि जीवनशैलीतील बदल प्रजनन परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा करतात. पौगंडावस्थेपासूनच नियमित तपासणी केल्यास दीर्घकालीन प्रजनन गुंतागुंत टाळता येऊ शकते. औषधे, जीवनशैलीतील बदल आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांचे संयोजन करणाऱ्या व्यापक उपचार पद्धती रुग्णांमध्ये आशादायक परिणाम दर्शवितात. विवाहित किंवा अविवाहित महिलांमध्ये अनियमित मासिक पाळीची समस्या आढळल्यास वेळीच स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जीवनशैलीचे योग्य व्यवस्थापन, औषधोपचार आणि वेळीच उपचारांनी प्रजनन परिणामांमध्ये सुधारणा होतात. वंध्यत्वाच्या समस्या असलेल्या महिलांसाठी पीसीओएस तपासणी देखील केली जाते. पीसीओएस असलेल्या वंध्यत्वाशी झुंजणाऱ्या महिलांसाठी नोवा आयव्हीएफ येथे वैयक्तित उपचार व मार्गदर्शनाकरिता पीसीओएस क्लिनिक उपलब्ध, जिथे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमशी संबंधित प्रजनन समस्या व्यवस्थापित करण्यास मदत केली जाते. पीसीओएस असलेल्या बहुतेक महिला आयव्हीएफ उपचारांसाठी स्वतःचे स्त्रीबीज आणि त्यांच्या जोडीदाराच्या शुक्राणूंचा वापर करू शकतात, ज्याला सेल्फ-सायकल म्हणून ओळखले जाते ज्यात स्वतःच्या गेमेट्सचा वापर केला जात असल्याचे डॉ जाधव यांनी स्पष्ट केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …