Home शासकीय दूरशिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

दूरशिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

8 second read
0
0
171

no images were found

दूरशिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर : ३१ ऑक्टोबर, शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची बी.ए.,बी.कॉम,एम.ए.(मराठी,हिंदी,इंग्रजी,समाजशास्त्र,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र,इतिहास), एम.कॉम, एम.एस्सी (गणित) आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थी हितास्तव मंगळवार दि.१५ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली.

डॉ.मोरे म्हणाले की, जे विद्यार्थी अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांचे शिक्षण अपूर्ण आहे, शिवाय महाविद्यालयास तुकडी मान्यता न मिळाल्याने,तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच १२ वी रिपीटरच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केलेला आहे. अशा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दूरशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या एकूण ८७ अभ्यासकेंद्रात प्रवेशाची संधी मिळणार आहे.त्यामुळे विद्यार्थी, गृहिणी, कामगार,सैनिक,उद्योजक,शेतकरी, सरकारी कर्मचारी,खाजगी कंपन्या आदीनी आपला प्रवेश निश्चित करावा.

शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर Distance Education लिंकवर प्रवेशाबाबतची जाहिरात उपलब्ध असून http://sukapps.unishivaji.ac.in/studentregistration/#/ या ऑनलाईन लिंकवर आपला प्रवेश आजच निश्चित करावा. जे विद्यार्थी नियमित महाविद्यालयात प्रवेशित झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचा ही लाभ मिळणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमाना प्रवेशित व्हावे. अधिक माहितीसाठी शिवाजी विद्यापीठातील मुख्य कार्यालयाशी अथवा नजीकच्या महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा,असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे  यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कार…