no images were found
शिवाजी विद्यापीठात बेटी बचाओ समन्वयकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा
शिवाजी विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या बेटी बचाओ अभियान अंतर्गत शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील व शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील बेटी बचाओ समन्वयक/समन्वयिकांसाठी एक दिवशीय कार्यशाळा शनिवार दि. 29 ऑक्टोबर, 2022 रोजी आयोजित करण्यात आली हेाती. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयिका डॉ. प्रतिभा देसाई यांनी केले. या कार्यशाळेसाठी उद्घाटन प्रसंगी मा. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के व मा. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस पाटील हे उपस्थित होते यावेळी मा. कुलगरू म्हणाले मुलींच्या शिक्षणाला महत्व दिले पाहिजे कारण शिक्षणातून मुलींना आत्मविश्वास येतो. विद्यापीठ व महाविद्यालय मुलींना शिक्षणाच्या प्रभावात जास्तीजास्त आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच मा. प्र-कुलगुरू नी देखील आपले मत मांडून असे सांगितले पोस्ट ग्रॅडयूएशन मधून संशोधनाकडे येण्याचे मुलींचे प्रमाण अल्प असून ड्रॉपआउट रेटची कारणे शोधून काढणे आणि विद्यापीठ व महाविद्यालयामध्ये जास्तीजास्त प्रमाणात मुलींसाठी सुवीधा पुरवून देण्याचे काम केले पाहिजे. या कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. भारती पाटील, समन्वयक, कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार यांनी उपस्थिती दर्शवली त्यांनी आपले विचार मांडताना असे सांगितले की, मुलगी शिकली तर तीला आत्मभान येते आणि स्त्रियांनी आपल्या दुय्यमतेतून बाहेर पडले पाहिजे. अन्यायाच्या विरोधात बोलायला शिकले पाहिजे. उद्घाटन सत्राचे आभार डॉ. एन. एल. तरवाल यांनी मानले.
या कार्यशाळेसाठी दुसÚया सत्रात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संगीता देसाई, Visiting Faculty Sophia Centre For Women’s Development Studies, मुंबई यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली त्यांनी भारतातील स्त्रीभ्रूण हत्याची कारणे व परिणाम स्पष्ट केले. श्रीमती. शिल्पा पाटील, महिला बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद या उपस्थित होत्या त्या म्हणाल्या कोल्हापूर जिल्हयातील वाढते बालविवाह रोखण्यासाठी मास्टर ट्रेनरची गरज असून विद्यार्थी व शिक्षकांनी मास्टर ट्रेनरची टीम तयार करावी. या सत्राचे आभार डॉ. योजना पाटील यांनी मानले. तिसÚया सत्रात श्री. संजय काशिनाथ देशपांडे, समाज कार्यकर्ते व प्रशिक्षक, कोल्हापूर हे उपस्थित होते त्यांनी आपले विचार मांडताना सांगितले पीसीपीएनडीटी कायदयाची कडक अमंलबजावणी होत असून देखील त्यातून पळवाटा काढल्या जातात तरी विद्याथ्र्यांची पीअर एडयुकेटर टीम तयार करून खेडोपाडी हा संदेश पोहचला गेला पाहिजे. शेवटच्या सत्राचे आभार समन्वयिका डॉ. प्रतिभा देसाई यांनी मानले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यार्थी विकासचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव आणि या कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील व शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील बेटी बचाओ समन्वयक/समन्वयिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सचिन कदम यांनी केले.