Home सामाजिक ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा होण्यासाठी प्रयत्न करू ! – प्रकाश आबीटकर, 

‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा होण्यासाठी प्रयत्न करू ! – प्रकाश आबीटकर, 

7 second read
0
0
52

no images were found

‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा होण्यासाठी प्रयत्न करू ! – प्रकाश आबीटकर, 

कोल्हापूर(प्रतिनिधी ):- राज्यभरात असंख्य हिंदु युवती आणि महिला ‘लव्ह जिहाद’च्या षडयंत्राला बळी पडलेल्या आहेत. हे षडयंत्र रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात कठोर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पालकमंत्री श्री. प्रकाश आबीटकर यांच्याकडे यांच्याकडे केली. या वेळी श्री. आबीटकर यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा होण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. याच मागणीचे निवेदन भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक आणि भाजपचे आमदार श्री. अमल महाडिक, तसेच शिवसेनचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनाही देण्यात आले. या सर्वांनीही ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा होण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले.
‘लव्ह जिहाद’ हे केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतर, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या, मानवी तस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री अन् आतंकवादी कारवायांत सहभाग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात ‘लव्ह जिहाद’ला असंख्य हिंदु युवती आणि महिला बळी पडल्या आहेत. त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभियान राबवले जात आहे.
     महिलांच्या हातातील लक्षवेधी फलक !
या वेळी युवती आणि महिला यांनी हातात वैशिष्ट्यपूर्ण फलक धरले होते. या फलकांवर ‘हिंदू मुलींना लव्ह जिहाद विषयात जागृत करणारी, मी ही माता दुर्गेचे रूप बनेन ! ‘मै हूं दुर्गा’ , असा मजकूर लिहिण्यात आला होता.
या प्रसंगी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. कैलास दीक्षित, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री मनोजकुमार चौगुले, संजय माळी, दिलीप दळवी, घन:शामभाई पटेल, भाजपच्या महिला सरचिटणीस सौ. वंदनाताई बंबलवाड, श्री. हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे, सौ. प्रीती पवार, सौ. साधना गोडसे, श्री. शिवानंद स्वामी, श्री. महेंद्र अहिरे, उद्योजक श्री. आनंद पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…