Home सामाजिक गौतम अदाणी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली

गौतम अदाणी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली

8 second read
0
0
41

no images were found

गौतम अदाणी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) आपल्या औपचारिक उद्घाटनाच्या आधी अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या उद्घाटनापूर्वी अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी विमानतळाला भेट देऊन तयारीची पाहणी केली.

      गौतम अदाणी यांनी विमानतळाच्या तांत्रिक प्रगती आणि संचालनाची सखोल तपासणी केली. पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर हा विमानतळ दरवर्षी ९ कोटी प्रवाशांची सोय करू शकेल, ज्यामुळे तो जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विमानतळांमध्ये गणला जाईल.

      या प्रसंगी गौतम अदाणी यांनी विमानतळ घडवणाऱ्या विविध गटांशी संवाद साधला. त्यांनी बांधकाम कामगार, अभियंते, प्रकल्प टीम, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि टर्मिनलमधील रिटेल आउटलेटमध्ये काम करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांशी देखील भेट घेतली.

    या वेळी गौतम अदाणी म्हणाले –“येथील प्रत्येक धावपट्टी, प्रत्येक टर्मिनल आणि प्रत्येक गेट हजारो हात आणि हृदयांशी जोडलेले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प नाही, तर भारताच्या भावनेचे आणि सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे – भारताच्या लोकांनी, भारताच्या लोकांसाठी घडवलेला.”

     पंतप्रधानांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटनापूर्वीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील हवाई वाहतुकीवरील गर्दी कमी करण्यासाठी, प्रादेशिक आणि राष्ट्रीय आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि भारताच्या भविष्याचे प्रवेशद्वार ठरण्यासाठी पूर्णतः सज्ज झाला आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…