no images were found
महाराष्ट्रातील सर्वात मोठा गरबा “नमो रमो नवरात्री २०२५”
महाराष्ट्रातील सर्वात मोठा गरबा म्हणून नावलौकिक मिळवलेला डोंबिवलीचा “नमो रमो गरबा” आता गरबाप्रेमींसोबत देवीभक्तांसाठीही श्रद्धेचे स्थान बनत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात उभारलेल्या भव्य मंडपात या नमो रमो गरब्यात प्रवेश केल्यावर अत्यंत पवित्र तितकेच भव्य असे अंबे मातेचे मंदिर उभारण्यात आले आहे. जिथे दररोज वेगळ्या रंगातील नैसर्गिक फुलांची आकर्षक आणि अतिशय नाविन्यपूर्ण आरास करण्यात येते. त्यामुळे गरबा मनोरंजनाहून अधिक श्रद्धेचा व आस्थेचा विषय झाल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
मुंबई आणि महाराष्ट्रात डोंबिवलीचा “नमो रमो गरबा” आता फार प्रसिद्ध झाला आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवलीची कीर्ती सर्वत्र आहेच. पण गेली काही वर्ष “नमो रमो नवरात्री” या नावाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सवही डोंबिवलीतच साजरा केला जातो त्यात जगप्रसिद्ध गरबा कलाकार येण्यास उत्सुक असतात. यंदा सुप्रसिद्ध गायक निलेश गढवी, अल्पा बेन पटेल, राहुल पुरेचा, माधवी श्रीवास्तव, अंशिका चोणकर नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या नमो रमो नवरात्रीचा उत्सव रंगतदार करत आहेत. पण याच सोबत सिंधुदुर्गातील भजनी मंडळांचे जोशपूर्ण सादरीकरण यंदाचे खास आकर्षण ठरले. त्याच सोबत देवीमाहात्म्य पारायण, चण्डियाग, ललिता सहस्रामृत निमित्ताने झालेल्या वेदमंत्रांनी नमो रमो मंडपात नादब्रह्म सुरांची अनुभूती मिळाल्याची प्रतिक्रिया देवीभक्तांनी बोलताना दिली.
केवळ कल्याण डोंबिवलीच नाही तर ठाणे मुंबई, वाशी, पालघर आणि मुंबई बाहेरून गरबा खेळण्यासाठी पारंपारिक वेशभूषेत गरबा प्रेमी अवघी तरुणाई या नमो रमो नवरात्रीत उत्साहात सामील होते. सालाबादप्रमाणे या वर्षीही सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धबडे ह्यांनी भव्य सेट उभारला आहे. तसेच यावर्षी पूर्ण वातानुकूलित अंदाजे ७० हजार स्क्वेअर फूट प्लेयिंग अरेना आहे. त्यासाठी स्वस्तिक इव्हेंट्सचे अनिल पासड ह्यांनी १३५ फूट बाय ५०० फूट अशा भव्य एसी डोमची निर्मिती केली आहे.
टीटू कुलकर्णी ह्यांचा जबरदस्त साऊंड असून दरवर्षी प्रमाणे यंदाही गरबा प्रेमींना सुरक्षित, निरोगी आणि आनंदी वातावरणात गरब्याचा मनमुराद आनंद लुटता यासाठी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर बारकाईने विशेष लक्ष देण्यात आले आहे. म्हणूनच एसी टॉयलेट्स, अनुचित प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही आणि बाऊन्सर्सची प्रायव्हेट सिक्युरिटी या बरोबरच फूड कोर्ट, पार्किंग, सेल्फी पॉईंट्स अशी उत्तम व्यवस्था केली आहे.
घटस्थापना ते नवमी असा नऊ रात्रींचा गरबा एक आनंददायी आणि भरपूर ऊर्जा देणारा अनुभव बनल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. दसऱ्याच्या दिवशी होणारं रावण दहन पाहण्यासाठी तर अलोट गर्दी होते. हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता नमो रमो नवरात्रीमध्ये येण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.