Home सामाजिक प्रशासकीय कामकाजात भाषिक लेखन कौशल्याची संस्कृती जोपासणे महत्वाचे : प्रा.डॉ.अनिल गवळी

प्रशासकीय कामकाजात भाषिक लेखन कौशल्याची संस्कृती जोपासणे महत्वाचे : प्रा.डॉ.अनिल गवळी

1 second read
0
0
44

no images were found

प्रशासकीय कामकाजात भाषिक लेखन कौशल्याची संस्कृती जोपासणे महत्वाचे : प्रा.डॉ.अनिल गवळी
कोल्हापूर (प्रतिनिधी ): प्रशासकीय कामकाजात कर्मचारी यांनी भाषिक लेखन कौशल्याची संस्कृती जोपासणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मराठी विषयाचे माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल गवळी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या मराठी विषयांतर्गत शाहू सभागृहात येथे अधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आयोजित प्रशासकीय कामकाजातील भाषिक लेखन कौशल्य या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ.विलास शिंदे होते.
डॉ.गवळी म्हणाले ,प्रशासकीय कर्मचाऱ्यासाठी श्रवण म्हणजेच चांगले ऐकणे महत्वाचे आहे.त्यासाठी व्याख्याने ,मुलाखती,कथा ,प्रवास वर्णने ऐकणे गरजेचे आहे.ललित,कथा,कादंबरी,पर्यावरण पूरक पुस्तके,संदर्भ बहुलता,विज्ञानाची पुस्तके ,वैचारिक साहित्य यांचे वाचन केले पाहिजे.इतरांनी संभाषण करताना व्यवथित साध्या सरळ भाषेत केले पाहिजे. प्रशासकीय कर्मचारी यांनी सातत्याने लेखन केले पाहिजे.त्यामध्ये प्रवास वर्णन ,अनुभव, डायरी,पत्र लेखन ,ई-मेल याचा समावेश होतो. त्यामुळे प्रशसकीय लेखन वाढीस लागते.त्याच बरोबर देहबोली महत्वाची असते.शब्दसंग्रह हे भाषिक लेखनासाठी कौशल्य म्हणून महत्वाचे आहे.
टिपणी लेखनाचा हेतू अर्ज, प्रकरणे निकाली काढणे असून त्यावर निर्णय घेणे,वरिष्ठांना माहिती देणे हा असतो.प्रश्न समजून घेतला नाही तर टिपणी लिहिता येत नाही.माहितीपर आधारित टिपणी तयार केली पाहिजे.त्यासाठी भाषा साधी, वाक्ये छोटी,कालक्रमानुसार माहिती दिली पाहिजे.त्यामध्ये उपयुक्त संदर्भ ,मुद्यानुसार क्रम दिले पाहिजेत आणि शेवटी निष्कर्ष काढला पाहिजे.निर्णय दिला पाहिजे.प्रत्येक विभागाने कर्मचाऱ्याना एक दिवसाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.त्याच बरोबर आपापल्या कामकाजाची हस्तपुस्तिका तयार केली पाहिजे.असे डॉ.गवळी यांनी सांगितले.
कुलसचिव डॉ.विलास शिंदे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,प्रशासकीय कामकाजात कर्मचारी यांनी भाषिक लेखन कौशल्य अंगीकारल्यास प्रशासकीय प्रतिमा व लौकिकता वाढीस लागण्यास मदत होणार आहे.प्रशासकीय कामकाज करताना भाषिक कौशल्याचा वापर केला केला पाहिजे.युनिकोडचा वापर केला पाहिजे. व्याकरणातील चुका टाळल्या पाहिजेत.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉ.कृष्णा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सहा.प्राध्यापक डॉ.प्रवीण लोंढे यांनी केले तर कनिष्ठ लेखनिक तेजस्विनी शिंदे यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव डॉ.संजय कुबल, विभा अंत्रेडी, निवास माने, गजानन पळसे, डॉ.निलेश बनसोडे, डॉ.उत्तम सकट तसेच विविध अधिविभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …