Home शासकीय नमो नेत्र अभियानाचा लाभ रुग्णांनी घ्यावा – जिल्हाधिकारी

नमो नेत्र अभियानाचा लाभ रुग्णांनी घ्यावा – जिल्हाधिकारी

8 second read
0
0
67

no images were found

नमो नेत्र अभियानाचा लाभ रुग्णांनी घ्यावा – जिल्हाधिकारी

 कोल्हापूर  : नमो नेत्र संजीवनी अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील वंचित रुग्णांना नवी दृष्टी देण्याचे काम आपण सर्वांनी करूया असे प्रतिपादन जिल्हाधिकारी  अमोल येडगे यांनी केले .   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व जिल्हा प्रशासन कोल्हापूर यांच्या समन्वयाने, ‘ नमो नेत्र संजीवनी ‘ हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार . यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या  मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या अभियानामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत येणारे सर्व रुग्णालय व धर्मादाय रुग्णालय व महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत येणारे रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर व नेत्र चिकित्सा विषयात काम करणाऱ्या सामाजिक संस्थेमार्फत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार असून यामध्ये ज्या रुग्णांना मोफत चष्मे व मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे अशांची तपासणी करून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत तसेच नेत्रदान नोंदणी केली जाणार आहे.

       या अभियानातून गोरगरीब वंचित घटकांना जे मित्र नेत्र विकार ग्रस्त आहेत अशांना नेत्र संजीवनी मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख , कोल्हापूर डॉ. चंद्रकांत परुळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ.आर एम कुलकर्णी, नेत्र चिकित्सक डॉ. चेतन खारकांडे, लायन्स नेत्रचे श्री चांडक, राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे  डॉ. ढवळे  उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…