Home मनोरंजन विनोदी मालिका ‘घरवाली पेडवाली’मध्‍ये हर्ष वशिष्‍ट रमेशच्‍या भूमिकेत!

विनोदी मालिका ‘घरवाली पेडवाली’मध्‍ये हर्ष वशिष्‍ट रमेशच्‍या भूमिकेत!

1 min read
0
0
64

no images were found

 विनोदी मालिका घरवाली पेडवाली’मध्‍ये हर्ष वशिष्‍ट रमेशच्‍या भूमिकेत!

एण्‍ड टीव्‍हीवरील आगामी नवीन मालिका घरवाली पेडवाली’ प्रेक्षकांना भयावह ट्विस्‍ट, विनोद, भावना व अलौकिक शक्‍तीसंदर्भातील धमालीसह हसवून-हसवून लोटपोट करण्‍यास सज्‍ज आहे. या उत्‍साहामध्ये भर करत आहेत सुप्रसिद्ध व प्रतिभावान अभिनेता हर्ष वशिष्‍ट. टेलिव्हिजनवरील काही संस्‍मरणीय मालिकांमध्‍ये उत्तम भूमिका साकारण्‍यासह त्‍यांचे सर्वोत्तम करिअर राहिले आहे. ते मालिकेमध्‍ये रमेशची भूमिका साकारणार आहेत, ज्‍याला प्रेमाने ‘द चिल्‍ड चाचा’ म्‍हणतात. या भूमिकेसह ते निश्चिंत, विनोदी व धमाल मोहकतेची भर करतात, जे प्रेक्षकांना हसवून हसवून लोटपोट करतील, तसेच चर्चा करण्‍यास भाग पाडतील. त्‍यांची अद्वितीय ऊर्जा त्‍यांना या असामान्‍य प्रेम त्रिकूट असलेल्‍या मालिकेचा भाग असणे स्‍वाभाविक बनवते. 

या भूमिकेबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत हर्ष वशिष्‍ट ऊर्फ रमेश म्‍हणाले, “माझी कॉमेडी करण्‍याची इच्‍छा होती, कारण तुम्‍हाला माहित आहे की सध्‍या भारतीय टेलिव्हिजनवर क्‍वचितच विनोदी मालिका पाहायला मिळतात. गेल्‍या काही वर्षांपासून मी या शैलीमध्‍ये काम करणे खूप मिस करत होतो आणि या प्रोजेक्टसाठी विचारण्‍यात आले तेव्‍हा मला लगेचच ही भूमिका योग्‍य असल्‍याचे वाटले. मालिकेची संकल्‍पना नवीन आहे, टीम अद्भुत आहे आणि कथानक उत्तम आहे. मला या उत्तम प्रकल्‍पाचा भाग असण्‍याचा खूप आनंद झाला आहे आणि रमेशच्‍या भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास दाखवण्‍याकरिता एण्‍ड टीव्‍ही, पेनिन्‍सुला पिक्‍चर्स, प्रोडक्‍शन व माझ्या कास्टिंग दिग्‍दर्शकांचे मी मनापासून आभार मानतो.”  

या मालिकेसाठी उत्‍सुक असलेले ते पुढे म्‍हणाले, “मला मालिका ‘घरवाली पेडवाली’बाबत आवडलेली बाब म्‍हणजे मालिकेची संकल्‍पना, जी अनोखी, अत्‍यंत नवीन आहे आणि आपल्‍याला टेलिव्हिजनवर फारशी पाहायला मिळत नाही. हॉरर व कॉमेडीचे मिश्रण वाढती शैली आहे आणि ही मालिका त्‍या शैलीला अत्‍यंत मनोरंजनपूर्ण कौटुंबिक वातावरणामध्‍ये सादर करते. मालिकेचे शीर्षक लक्षवेधक व रोचक आहे आणि अधिक तपशीलवार, विनोद व विलक्षण कृत्‍यांसह पात्रांचे लेखन करण्‍यात आले असल्‍यामुळे ही मालिका अत्‍यंत धमाल आहे. मला या अद्भुत टीमचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. मी प्रेक्षकांना या मालिकेमधील विलक्षणतेचा आनंद घेताना पाहण्‍यास अत्यंत उत्सुक आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…