Home बँकिंग एचडीएफसीने १,००० हून अधिक शिक्षकांना सुरक्षित डिजिटल बँकिंग पद्धतींबद्दल प्रशिक्षण दिले

एचडीएफसीने १,००० हून अधिक शिक्षकांना सुरक्षित डिजिटल बँकिंग पद्धतींबद्दल प्रशिक्षण दिले

35 second read
0
0
38

no images were found

एचडीएफसीने १,००० हून अधिक शिक्षकांना सुरक्षित डिजिटल बँकिंग पद्धतींबद्दल प्रशिक्षण दिले

मुंबई,: भारतातील आघाडीची खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने, भारतातील शाळा आणि महाविद्यालयांमधील १,००० हून अधिक शिक्षकांना सुरक्षित डिजिटल बँकिंग पद्धतींबद्दल जागरूक करण्यासाठी एक आभासी सत्र आयोजित केले.

      या सत्राच्या माध्यमातून, शिक्षकांना सुरक्षित डिजिटल बँकिंग पद्धतींबद्दल मौल्यवान माहिती मिळाली. नागरिकांना सतर्क राहण्यास आणि सायबर स्कॅमर्सपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

      या सत्रात वास्तविक जीवनातील उदाहरणे, कथा आणि व्हिडिओंचा समावेश करण्यात आला होता, ज्यामुळे सहभागींना फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेल्या विविध पद्धती समजून घेण्यास मदत झाली. एचडीएफसी बँक, गेल्या चार वर्षांपासून देशभरातील विविध ठिकाणी सुरक्षित बँकिंग उपक्रमांतर्गत सायबर फसवणूक जागरूकता सत्रे आणि कार्यशाळा आयोजित करत आहे.

    या कार्यशाळेत डिजिटल सुरक्षेची चांगली समज देणाऱ्या विविध समर्पक विषयांचा समावेश करण्यात आला होता:

 1.    सायबर फसवणूक जागरूकता: व्हिशिंग, फिशिंग, स्मिशिंग, रिमोट डिव्हाइस अॅक्सेस, सिम स्वॅप आणि यूपीआय फसवणूक यासारख्या नेहमीच्या सायबर धोक्यांबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. गुंतवणूक, नोकरीच्या ऑफर, डिजिटल अरेस्ट, बनावट कुरियर इत्यादींच्या नावाखाली होणारे घोटाळे ओळखणे आणि त्यापासून संरक्षण करण्याच्या पद्धती यावरही चर्चा केंद्रित होत्या. समज वाढवण्यासाठी वास्तविक जीवनातील उदाहरणे वापरली गेली.

 2.    सुरक्षित नेट-बँकिंग आणि खरेदीच्या उपयुक्त सूचना: या सत्रांमध्ये सुरक्षित ऑनलाइन व्यवहारांसाठी सर्वोत्तम पद्धती आणि सुरक्षित ऑनलाइन खरेदीसाठी उपयुक्त सुचना अधोरेखित करण्यात आल्या.

 3.    प्रतिबंधात्मक उपाययोजना: उपस्थितांना त्यांचे संवेदनशील बँक क्रेडेन्शियल्स उघड न करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

 4.    संशयास्पद घोटाळ्यांची तक्रार करा: www.sancharsaathi.gov.in या चक्षु पोर्टलवर कोणत्याही संशयास्पद कॉल/संदेशाची तक्रार करा.

        यावर भाष्य करताना, श्री. मनीष अग्रवाल, वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष – क्रेडिट इंटेलिजेंस अँड कंट्रोल – एचडीएफसी बँक, म्हणाले, “जागरूकतेचा अभावामुळे लोक सायबर फसवणुकीला बळी पडतात. म्हणूनच लोकांना संवेदनशील करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते गोपनीय बँकिंग डेटा शेअर करणार नाहीत किंवा पडताळणी न केलेल्या लिंक्सवर क्लिक करणार नाहीत. या सत्रांचा उद्देश, शिक्षकांना ऑनलाइन जगात सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्यासाठी योग्य ज्ञानाने सुसज्ज करणे हा आहे.

       बँक, ग्राहकांना डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि सुरक्षित बँकिंग सवयींचा अवलंब करण्याचे आणि त्यांची वैयक्तिक बँकिंग माहिती कोणालाही शेअर करण्याचे टाळण्याचे प्रोत्साहन देते. जर ग्राहक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडले, तर त्यांनी तात्काळ बँकेला अनधिकृत व्यवहारांची तक्रार करावी आणि भविष्यातील नुकसानापासून बचाव करण्यासाठी पेमेंट मोडला ब्लॉक करून घ्यावे. ग्राहकांनी, गृह मंत्रालयाने (एमएचए) सुरू केलेल्या १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून देखील तक्रार दाखल करावी आणि राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल https://cybercrime.gov.in वर तक्रार सादर करावी.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…