Oplus_131072
no images were found
शक्ती एनर्जी सोल्युशन्सकडून एआय-आधारित इन्व्हर्टर व ‘भारत-रेडी’ सोलर रूफटॉपचे भव्य लाँचिंग
पुणे :आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकत, शक्ती एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने पुण्यातील फोर पॉइंट्स बाय शेरेटन हॉटेलमध्ये एआय-आधारित सनशक्ती इन्व्हर्टर आणि अत्याधुनिक ‘भारत-रेडी’ सोलर रूफटॉप सिस्टिमचे भव्य लाँचिंग केले. या कार्यक्रमाला प्रमुख भागीदार, डीलर्स आणि स्टेक होल्डर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात ‘मेड इन भारत, मेड फॉर भारत’ या विचारातून विकसित केलेली नेक्स्ट जनरेशन सोलर रूफटॉप प्रणाली सादर करण्यात आली. भारतीय हवामान लक्षात घेऊन डिझाईन केलेली ही प्रणाली उत्कृष्ट ऊर्जा उत्पादन, अधिक टिकाऊपणा आणि विषम हवामान परिस्थितीतही दर्जेदार कामगिरी करण्यास सक्षम असल्याचे कंपनीने नमूद केले.
या लाँचिंगचे मुख्य आकर्षण ठरले सनशक्ती इन्व्हर्टर. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने सज्ज असलेला हा इन्व्हर्टर रिमोट कनेक्टिव्हिटी, प्रगत डिजिटल कंट्रोल आणि सोप्या इंस्टॉलेशनच्या सुविधांनी युक्त आहे. यामध्ये न्यूरल नेटवर्क तंत्रज्ञानाचा वापर केला असून, तो व्होल्टेजमधील बदल व पॉवर फ्लक्चुएशननुसार स्वतःला जुळवून घेतो. त्यामुळे भारतीय घरांमध्ये अधिक कार्यक्षमतेने व अखंडित वीजपुरवठा करण्यास तो सक्षम ठरणार आहे.
अपडेटेड मॉनिटरिंग सिस्टिममुळे ग्राहकांना रिअल-टाइममध्ये ऊर्जा उत्पादन तपासता येणार आहे. यामुळे पारदर्शकता वाढून स्मार्ट एनर्जी मॅनेजमेंट शक्य होईल, असे सीईओ रामकृष्ण सतलुरी यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित चॅनल पार्टनर्स व डीलर्सनी उत्तर प्रदेशासह देशातील विविध राज्यांमध्ये सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला.
सीईओ सतलुरी म्हणाले, “आमचे ध्येय केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे नाही, तर समाजाला स्वच्छ, विश्वासार्ह आणि स्मार्ट ऊर्जा सोल्युशन्सने सक्षम करणे आहे. आमच्या भागीदारांच्या सहकार्याने आम्ही भारतातील स्वच्छ ऊर्जा क्रांतीचे नेतृत्व करू.”