Home बँकिंग सिट्रोएन इंडिया आणि एचडीएफसी बँक यांच्यात रिटेल व डिलर फायनान्स सोल्यूशन्ससाठी सामंजस्य करार

सिट्रोएन इंडिया आणि एचडीएफसी बँक यांच्यात रिटेल व डिलर फायनान्स सोल्यूशन्ससाठी सामंजस्य करार

50 second read
0
0
38

no images were found

सिट्रोएन इंडिया आणि एचडीएफसी बँक यांच्यात रिटेल व डिलर फायनान्स सोल्यूशन्ससाठी सामंजस्य करार

·         स्टेलॅंटिस ब्रँड्ससाठी एचडीएफसी बँक प्राधान्य वित्तीय भागीदार :आधी जीप, मॅसेराटी आणि आता सिट्रोएन.

·         ग्राहकांना स्पर्धात्मक व्याजदर, सुलभ परतफेडीच्या सुविधा आणि ‘एचडीएफसी एक्सप्रेस कार लोन– ३० मिनिटांत डिजिटल वितरित, कोणत्याही कागदपत्रांशिवाय.

·         एचडीएफसी बँकेच्या विस्तृत नेटवर्क आणि विश्वासार्ह परंपरेचा लाभ घेत, ही भागीदारी ग्राहक व डिलर्स दोघांसाठी अधिक सोयीस्कर आणि वित्तीय सुलभ निर्माण करते.

         वाहनमालकी अधिक सुलभ करणे आणि ग्राहक व डिलर्ससाठी आर्थिक उपलब्धता वाढविणे या सामायिक दृष्टिकोनातून, सिट्रोएन इंडियाने देशातील सर्वात मोठ्या खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेशी सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत सर्वोत्तम दर्जाचे रिटेल व डिलर वित्तीय पर्याय उपलब्ध होतील. या धोरणात्मक पावलामुळे स्टेलॅंटिस–एचडीएफसी भागीदारी अधिक बळकट झाली असून आता जीप, मॅसेराटी आणि सिट्रोएनसह सर्व स्टेलॅंटिस ब्रँड्ससाठी एचडीएफसी बँक ही एकमेव प्राधान्य वित्तीय भागीदार ठरली आहे.

           या करारावर स्वाक्षऱ्या श्री.शिशिर मिश्रा, बिझनेस हेड आणि डायरेक्टर – स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स व इन्स्टिट्युशनल बिझनेस, स्टेलॅंटिस इंडिया आणि श्री. अखिलेश कुमार रॉय – बिझनेस हेड – वाहन कर्ज, इन्व्हेंटरी फायनान्स आणि टू-व्हीलर लोन, एचडीएफसी बँक यांनी केल्या. या प्रसंगी स्टेलॅंटिस इंडिया व एचडीएफसी बँकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

       एचडीएफसी बँकेचे संपूर्ण भारतभरचे नेटवर्क आणि दोन दशकांहून अधिक काळाची विश्वासार्ह परंपरा यामुळे सिट्रोएन ग्राहक व डिलर भागीदारांना मजबूत वित्तीय मदत मिळेल. ग्राहकांसाठी या भागीदारीमुळे स्पर्धात्मक व्याजदर, सुलभ परतफेडीचे पर्याय आणि अधिक सोय उपलब्ध होणार आहे.

      या उपक्रमातील खास आकर्षण म्हणजे *एचडीएफसी एक्सप्रेस कार लोन*, ज्याद्वारे केवळ ३० मिनिटांत पूर्णपणे डिजिटल माध्यमातून कर्ज वितरण केले जाईल आणि कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज भासणार नाही. यामुळे गाडी खरेदीची प्रक्रिया अधिक वेगवान, सोपी आणि ग्राहकाभिमुख ठरेल. वाहन कर्ज हे एचडीएफसी बँकेच्या रिटेल अॅसेट्स विभागाचे महत्त्वाचे योगदान ठरले आहे. ३० जून २०२५ पर्यंत बँकेचा ऑटो लोन पोर्टफोलिओ ₹१.४८ लाख कोटींपेक्षा अधिक होता.

        सिट्रोएन डिलर भागीदारांसाठी, या भागीदारीमुळे खास डिझाइन केलेले फ्लोअरप्लॅन वित्तीय पर्याय उपलब्ध होतील, जे त्यांच्या दैनंदिन कामकाज व व्यवसाय वृद्धीसाठी उपयुक्त ठरतील. डिलर्सना स्पर्धात्मक दर, विशेष अटी व विविध वित्तीय उत्पादने मिळतील. तसेच कार्यभांडवल व इन्व्हेंटरी फंडिंगसाठी सोपे प्रोसेसिंग मिळाल्यामुळे त्यांची वित्तीय सुलभ आणि कार्यक्षमता अधिक मजबूत होईल.

       या भागीदारीबाबत स्टेलॅंटिस इंडियाचे बिझनेस हेड व डायरेक्टर – स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स व इन्स्टिट्युशनल बिझनेस श्री. शिशिर मिश्रा म्हणाले,“गाडी खरेदीच्या प्रवासात फायनान्सिंगची महत्त्वाची भूमिका असते. आजचे ग्राहक स्मार्ट आणि सुलभ वित्तीय पर्याय शोधतात, जे त्यांच्या जीवनशैली आणि सोयींशी जुळतील. वेग, पारदर्शकता आणि सोय हे त्यांच्यासाठी निर्णायक घटक ठरतात. सिट्रोएनमध्ये आम्ही मोबिलिटी अधिक सुलभ व सहज करण्यावर विश्वास ठेवतो. एचडीएफसी बँकेसोबतची ही भागीदारी आमच्या वित्तीय परिसंस्थेला अधिक बळकट करते आणि सर्व टचपॉइंट्सवर विश्वासार्ह व सोयीस्कर अनुभव देण्याच्या आमच्या बांधिलकीला पुन्हा अधोरेखित करते.”

       एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड – रिटेल अॅसेट्स श्री. अरविंद वोहरा म्हणाले,“सोपे वाहन वित्तीय प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी सिट्रोएनसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. एचडीएफसी बँकेचे विस्तृत नेटवर्क, ग्राहक-केंद्रित बँकिंग उत्पादने आणि मजबूत क्रेडिट इंटेलिजन्स क्षमतांमुळे गाडी खरेदीची प्रक्रिया अधिक वेगवान व सोयीस्कर होईल.”

    अधिक माहितीसाठी किंवा वर्धापन दिनाच्या ऑफर्सबाबत जाणून घेण्यासाठी ग्राहक Citroën.in ला भेट देऊ शकतात किंवा जवळच्या शोरूमशी संपर्क साधू शकतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…