Home सामाजिक रविवारपासून दैनंदिन पाणी पुरवठा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन 

रविवारपासून दैनंदिन पाणी पुरवठा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन 

10 second read
0
0
67

no images were found

रविवारपासून दैनंदिन पाणी पुरवठा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहराला पाणीपुरवठा करणा-या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमधून दोन पंपाद्वारे सध्या शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. सदरचा पाणीपुरवठा थोड्या कमी दाबाने होत असल्याने शहरांमध्ये मागील दोन दिवसापासून एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.  काळम्मावाडी थेटपाईप लाईन योजनेमधून सध्या दोन पंपाद्वारे पाणी उपसा करुन पाणी पुरवठा सुरु आहे.

काळम्मावाडी येथील उर्वरीत दोन पंपापैकी एका पंपामध्ये जो टेक्निकल फॉल्ट आलेला आहे. त्याकरीता महापालिकेने व जीकेसी कंपनीने ज्या कंपनीचे पंप व सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहेत त्या एबीबी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला  आहे. या कंपनीचा टेक्निकल इंजिनिअर उद्या सकाळपर्यंत काळम्मावाडी येथे दाखल होणार आहे. या इंजिनिअरद्वारे जो तांत्रिक दोष आहे त्याची तपासणी करुन कंपनीच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

दरम्यान शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील 33 केव्ही सब स्टेशन दुरुस्तीचे काम पुर्ण करुन घेण्यात आलेले आहे. उद्या दुपारपर्यंत शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील ट्रॉन्सफॉर्मची हिटींग करुन पंपिग स्टेशनची चाचणी घेण्यात येणार आहे. सायंकाळी उशीरा शिंगणापूर येथून पाणी पुरवठा सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रविवार, दि.31 ऑगस्ट रोजी शिंगणापूर मधून ए, बी व ई वॉर्डमधील राजारामपूरी सेक्शन, बालिंगामधून सी व डी वॉर्डला व काळम्मावाडी योजनेमधून कसबा बावडा तसेच संलग्न ई वॉर्डाला एकाच वेळी दैनंदिन पाणी पुरवठा सुरु करण्याचे नियोजन केले आहे.    

         तरी शहरातील नागरीकांनी विनंती करण्यात येते की, वरील कामे पुर्ण होईपर्यंत पाईपलाईनद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’ मराठी मालिका विश्वात नेह…