no images were found
शिवाजी विद्यापीठात श्री.चक्रधर स्वामी जयंती
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात आज श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते श्री.चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, डॉ.रणधीर शिंदे, सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.पंकज पवार, डॉ.दिपा इंगवले, डॉ.नईम नदाफ, हर्षद कांबळे यांच्यासह प्रशासकीय सेवक उपस्थित होते.