
no images were found
उस्मानाबादमध्ये रस्त्यात टायर जाळल्या; एसटी बस फोडल्या..
उस्मानाबाद : ठाकरे गटाकडून आज उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली होती. उस्मानाबादमधील आंदोलक शेतकरी पीक विम्यासाठी आक्रमक झाले आहेत. उस्मानाबादमध्ये अज्ञातांकडून काही एसटी बस फोडण्यात आल्या. तसेच शहरातील तेरणा कॉलेजसमोर आंदोलकांनी टायर जाळले. या घटनेचा परिणाम उस्मानाबाद बस डेपोच्या वाहतुकीवर झाला होऊन शहरामध्ये वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या सर्वच परिणाम शहरातील डेपोतील वाहतुकीवर झाला आहे. सध्या पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आलेली आहे.
आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून शेतकऱ्यांसाठी सुरु असलेले कैलास पाटील यांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद आता उस्मानबादमध्ये उमटू लागले आहेत.
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कैलास पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती लावली आहे. उस्मानाबादमधील पीक विम्याचं आंदोलन प्रकरण चिघळत असल्याचे चित्र समोर येतेय. हे आंदोलन 24 ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी आंदोलन सुरु केलेले होते. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी कैलास पाटील यांचे हे आमरण उपोषण सुरु आहे. उस्मानाबादमध्ये या आंदोलनास अधिक पाठिंबा मिळत असून या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलेय. हे आंदोलन अधिक तीव्र झाल्यास परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
कैलास पाटील यांना दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून एक पत्र देण्यात आलं होतं. उपोषणामुळे कैलास पाटील यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्यामुळे प्रशासनाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर आपण उपोषण सोडणार नाही, असे कैलास पाटील यांनी सांगितले होते.