
no images were found
गॅस सिलिंडर स्फोटात 7 पोलिसांसह 30 जण होरपळले, 10 जण गंभीर
औरंगाबाद : शुक्रवारी रात्री २.३० वाजता औरंगाबादमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन त्यामध्ये 7 पोलिसांसह 30 जण होरपळले. यामधील 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अनिल गोस्वामी (नगर पोलीस ठाणे हद्द, साहेबगंज परिसर, प्रभाग क्रमांक 24) यांच्या घरी छठ पूजा सुरू होती. घरातील सर्व सदस्य पूजा असल्याने गडबडीत होते. पूजेच्या प्रसादाची तयारी सुरु होती. अचानक गॅस गळती होऊन आग लागली. परिसरात एकच गोंधळ उडाला. परिसरातील नागरिक आग विझवण्यासाठी मदतीला धावले. या आगीत ७ पोलीसांसह ३० जण होरपळले आहेत.
घटनास्थळी ड्युटीवर असलेले पोलिसांचे पथक पोहोचले. आग विझवण्यासाठी पोलिसांनी सिलिंडरवर पाणी टाकताच त्याचा स्फोट झाला. दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून यापैकी 10 जणांना पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सामान्य असल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेत ७ पोलीस जखमी झाले ते असे :- जगलाल प्रसाद सैफ, महिला कॉन्स्टेबल प्रीती कुमारी, डीएपी अखिलेश कुमार, जवान मुकुंद राव जगलाल प्रसाद, ड्रायव्हर मोहम्मद मुअज्जम, साहेबगंज परिसरातील नगर परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार अनिल ओडिया, राजीव कुमार, शबदीर, अस्लम, सुदर्शन, एरियन गोस्वामी, छोटू आलम, अनिल कुमार, शाहनवाज यांच्यासह 30 हून अधिक लोक जखमी झाले.