no images were found
विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या मित्रावर वार करुन दहाव्या मजल्यावरुन ढकलून खून
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून दहाव्या मजल्याच्या गॅलरीतून ढकलून दिल्याने पत्नीच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला आहे. पती पंकज शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. निलेश अशोक जोर्वेकर असं खून करण्यात आलेल्या पत्नीच्या मित्राचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंकज शिंदे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. दोन दिवसांपूर्वी मी गावाला जात आहे, असं पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला. याच दरम्यान, पंकजच्या पत्नीला निलेश अशोक जोर्वेकर भेटायला आला. पंकजची पत्नी आणि निलेश हे दोघे अत्यंत जवळचे मित्र होते. पंकज हा पत्नीवर पाळत ठेवून होता. तो एक दिवस अगोदरच गावावरुन परत आला होता. तेव्हाच, निलेश आणि पत्नी हे दोघे त्यांच्या घरात गेले. त्या पाठोपाठ काही मिनिटांनी तिथं पंकज देखील पोहोचला. पत्नी समोरच मित्र निलेश आणि पती पंकज यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.
याच रागातून पंकजने धारदार शस्त्राने निलेशला भोसकले. या हल्ल्यात निलेश गंभीर जखमी झाला. एवढचं नाही तर पंकजने निलेशला घराच्या दहा मजल्याच्या गॅलरीतून थेट खाली ढकलून दिलं. यात, निलेशचा मृत्यू झाला.या घटनेनंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पंकजला अटक केली आहे.