Home स्पोर्ट्स डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रमाचा शुभारंभ

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रमाचा शुभारंभ

34 second read
0
0
105

no images were found

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रमाचा शुभारंभ

‘प्रीहॅब 121 इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स’सोबत संयुक्त उपक्रम

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):समृद्ध क्रीडा परंपरा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये या क्षेत्रातील विशेष ज्ञान  व करिअर संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठामध्ये स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी अभ्यासक्रम माहिती पुस्तिकेचे अनावरण करून याबाबतची घोषणा केली.  भारतातील आघाडीची क्रीडा विज्ञान शिक्षण संस्था ‘प्रीहॅब 121 इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स’च्या सहकार्याने क्रीडा विज्ञानमधील पदव्युत्तर डिप्लोमा व ४ प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहेत.

      डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या सभागृहात स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रम शुभारंभ सोहळा साजरा झाला. यावेळी कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, ‘प्रीहॅब 121’ चे संस्थापक डॉ. लुकमान शेख व महेर जुमानी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

      विद्यापीठात सुरू होणाऱ्या या क्रीडा अभ्यासक्रमांत स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, इन्ज्युरी रिहॅबिलिटेशन, स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी, अ‍ॅथलीट परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन व फिटनेस मॅनेजमेंट यांचा समावेश असेल. क्रीडा प्रशासन, स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट व स्पोर्ट्स मार्केटिंग क्षेत्रांत करिअरची संधी मिळेल.

      डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ. अमृत कुवर रायजादे यांनी प्रास्तविकामध्ये हे अभ्यासक्रम सुरु करण्यामागील भूमिका विषद केली.  यामुळे क्रीडा क्षेत्र व पूरक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

       कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा म्हणाले, कोल्हापूरसारख्या क्रीडा संस्कृती असलेल्या शहरात जागतिक दर्जाचे क्रीडा विज्ञान शिक्षण उपलब्ध होणार आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून नवे अभ्यासक्रम सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी लागणारे कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टीकोन येथे विकसित केला जाईल. उद्योग व शिक्षण क्षेत्राचा संगम साधून स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रमांद्वारे देशासाठी सक्षम क्रीडा व्यावसायिक तयार होतील.

       ‘प्रीहॅब 121 अॅकेडमी’ चे संस्थापक डॉ. लुकमान शेख म्हणाले, “क्रीडा विज्ञानातील सैद्धांतिक ज्ञान व प्रत्यक्ष प्रशिक्षण यातील अंतर कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या डी. वाय. पाटील विद्यापिठाच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायन्समध्ये जागतिक दर्जाचे, उद्योगाभिमुख शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील. या अभ्यासक्रमानंतर नोकरीबरोबर स्टार्टअपही शक्य असून त्यामुळे नवे जॉब तयार होतील.

एस स्पोर्ट्स एज्युकेशन टॅलेंटचे संस्थापक मेहर जुमानी यांनी आभार मानले. डॉ. मैथिली पाटील यांनी सूत्रसंचालन तर डॉ. सोनिया लोहान यांनी नियोजन केले.

        यावेळी सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, विद्यापीठ परीक्षा नियंत्रक अभय जोशी, आयक्युएसी संचालिका डॉ. शिंपा शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेरली, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैदयकीय अधीक्षक  डॉ. वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. उमराणी जे.,  डॉ. अजित पाटील, रुधीर बारदेस्कर, डॉ. आर. एस पाटील, डॉ. जे. ए. खोत, डी. एन. शेलार,  केएमसी कॉलेज प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे, स्पोर्ट्स डायरेक्टर शंकर गोनुगडे,  उपकुलसचिव संजय जाधव, जयदीप पाटील, अजित पाटील यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रमुख अधिकारी, प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’

घराला पूर्णत्व देणाऱ्या बाईची हृदयस्पर्शी कथा ‘बाई तुझा आशीर्वाद’ मराठी मालिका विश्वात नेह…