
no images were found
राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर
बीड : राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बीड जिल्हा रुग्णालयात सरप्राईज भेट दिली. यावेळी रुग्णालयातील मूलभूत सुविधा आणि सेवा संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश उपसंचालक लातूर यांना दिले आहेत. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते, यांना सुधारणा करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. तसेच उपचारामध्ये हलगर्जीपणा आणि रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही, असा सज्जड दम तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता विभाग, प्रसूती कक्ष आणि फिव्हर क्लिनिकला भेट दिली. यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते, खाजगी डायग्नोसिस सेंटर मधून रिपोर्ट त्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात विचारणा केली तसेच नवोदित बाळाला पोलिओ डोस दिल्याचं, बेबी कार्ड तयार नव्हते, यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
दरम्यान सध्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. मात्र मुंडे यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी खाजगी प्रॅक्टिस करू नये. जर केल्यास डीसमिस करू, असा दम देखील यावेळी मुंढे यांनी भरला आहे.