no images were found
शहरामध्ये 13 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा
कोल्हापूर, : अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी कमी झाली आहे. तसेच काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा बंद झाल्याने या योजनेतून शहराला पाणीपुरवठा करणे सध्या शक्य होत नाही.
या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनमधून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. आगामी पावसाची शक्यता तसेच पंचगंगा नदीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन या तिन्ही पंपिंग स्टेशनच्या क्षमतेनुसार पाणी उपसा करण्यात येणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन व काटकसरीने व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर शहर तसेच संलग्न उपनगरांमध्ये दि. 13 जून 2026 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा पाण्याची नासाडी टाळावी तसेच महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.