Home मनोरंजन ‘वीर हनुमान’ मालिकेत सूर्य देवाने हनुमानाला असूर्य लोकात पाठवले

‘वीर हनुमान’ मालिकेत सूर्य देवाने हनुमानाला असूर्य लोकात पाठवले

7 second read
0
0
161

no images were found

‘वीर हनुमान’ मालिकेत सूर्य देवाने हनुमानाला असूर्य लोकात पाठवले

 

सोनी सबवरील ‘वीर हनुमान’ मालिकेचे दमदार कथानक आणि त्यातील दिव्य साहस प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. या मालिकेत आन तिवारीने बाल हनुमानाची भूमिका केली आहे, तर सायली साळुंखे आणि आरव चौधरी अनुक्रमे माता अंजनी आणि केसरीच्या भूमिकेत दिसत आहेत. माहिर पांधीने वाली आणि सुग्रीव यांची दुहेरी भूमिका साकारली आहे. मालिकेत आता हनुमानाच्या जीवनातील परिवर्तनाचा अध्याय सुरू झाला आहे. आत्तापर्यंत प्रेक्षकांनी हनुमानाची जिज्ञासू वृत्ती आणि त्याचा दृढ निर्धार पाहिला आहे, आणि आता सुजाणता आणि सामर्थ्य मिळवण्याच्या दिशेने त्याने पहिले पाऊल उचलले आहे. नवीन आव्हानांना तोंड देत देत तो काही छुपी रहस्यं उघडकीस आणतो आणि त्याचा मार्ग त्याला एका महान उद्देशाकडे घेऊन जातो. त्याची नियती कशी उलगडते याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

आगामी भागांमध्ये, प्रेक्षक पाहतील की हनुमान मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच काही दिव्य कौशल्ये शिकण्यासाठी सूर्य देवाकडे (मल्हार पंड्या) जातो. पण, असे करताना त्याच्या दृढतेची परीक्षा होते, कारण सूर्यदेव तसेच अग्नी देव, यम देव आणि अश्विनी कुमार या देवता त्याची विनवणी नाकारतात. या दरम्यान हनुमानाला सूर्य देव आणि शनि देव यांच्यातील वितुष्टाबाबत समजते. एक निर्धार करून हनुमान असूर्य लोकात जतो, जो एक गूढ प्रांत आहे आणि तिकडे अनेक आभास आणि परीक्षा आहेत. या गूढ विश्वात हनुमानाला ताकद, सुजाणता आणि निष्ठा यांच्या कठीण परीक्षा द्यावा लागतात.

हनुमानाला अपेक्षित असलेल्या सुजाणतेचा शोध तो घेत असताना एक मोठा प्रश्न तर राहतोच की त्याला मिळालेल्या या नव्या ज्ञानामुळे त्याच्या प्रवासाची जडणघडण कशी होणार आहे?

बाल हनुमानाची भूमिका करणारा कलाकार आन तिवारी म्हणतो, “मी जेव्हा पाहिल्यांदा ऐकले की, हनुमान काही दिव्य कौशल्य शिकण्यासाठी सूर्य देव आणि शनि देव यांच्याकडे जाणार आहे, तेव्हा मी खूप रोमांचित झालो, कारण हनुमानाप्रमाणेच मलाही अॅक्शन दृश्ये करायला आणि नव्या गोष्टी शिकायला आवडतात. पण, मग मला समजले की सूर्य देव आणि अग्नी, यम वगैरे इतर देवता त्याला नकार देणार आहेत. मी माझ्या दिग्दर्शकाला विचारले की, ‘पण ते हनुमानाला शिकवत का नाहीत? हनुमानजीची फक्त शिकण्याचीच मागणी आहे ना!” त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, हेच हनुमानाचे वैशिष्ट्य आहे. तो कधीच हार मानत नाही, अगदी समस्त जगाने नकार दिला तरी! ही गोष्ट माझ्या मनात घर करून राहिली आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…